देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम, म्हणजे एक मंदिरच !

‘१२.१०.२०२५ या दिवशी मी माझ्या आईच्या (श्रीमती वासंती लावंघरे, सातारा यांच्या) समवेत देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. आम्ही प्रवास करत असलेली चारचाकी गाडी आश्रमाच्या फाटकाजवळ पोचल्यावर आईने प्रथम आश्रमाला आणि नंतर गाडीतून उतरल्यावर तेथील भूमीला वाकून नमस्कार केला. त्यामुळे मीही नमस्कार केला.

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

१. आश्रमात पाऊल ठेवताच चैतन्य जाणवणे 

स्वागतकक्षाच्या जवळ कु. वैभवी झरकर आमच्या स्वागतासाठी आली होती. आम्ही हात-पाय धुवून आश्रमात पाऊल ठेवताच मला पुष्कळ चैतन्य जाणवले.

सौ. स्नेहल सचिन हरणे

२. आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे

२ अ. ध्यानमंदिरात चैतन्य, प्रसन्नता आणि एक वेगळीच शांती जाणवणे अन् पूजेची उपकरणे तेजस्वी दिसणे : मला ध्यानमंदिरात चैतन्य, प्रसन्नता आणि एक वेगळीच शांती जाणवत होती. मला ध्यानमंदिरातील पूजेची उपकरणे अत्यंत तेजस्वी दिसत होती आणि त्यांच्याकडे पहातांना वेगळेच जाणवत होते; मात्र मला ते शब्दांत सांगता येत नव्हते. मी सौ. अंजली झरकर यांना विचारले, ‘‘ही उपकरणे सोन्याची आहेत का ? त्यांतून वेगळेच तेज प्रक्षेपित होत आहे.’’ तेव्हा त्यांनी सांगितले,  ‘‘ती पितळेची भांडी आहेत.’’ तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही ही भांडी घासण्यासाठी काय वापरता ?’’ त्यांनी सांगितले, ‘‘भांडी घासण्याची सेवा करणार्‍या साधकाने नामजप करत भावपूर्णरित्या भांडी घासली आहेत, तसेच ध्यानमंदिरातील चैतन्यदायी ऊर्जेने भांडी भारित झाली आहेत.’’

२ आ. सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करण्याच्या ठिकाणी अष्टगंधाचा सुगंध येणे : आम्ही सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करण्यासाठी गेलो. तेथील सेवा करण्याची पद्धत अतिशय नियमबद्ध असल्याने अल्पावधीत अधिक फलनिष्पत्ती देणारी वाटली. त्या ठिकाणी मला अष्टगंधाचा सुगंध येत होता; मात्र तिथे अष्टगंधाशी संबंधित सेवा चालू नव्हती.

२ इ. प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चारचाकी गाडीतून ‘सगळीकडे चैतन्यदायी प्रकाश पसरत आहे’, असे जाणवणे : आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चारचाकी गाडीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तेथे जातांना मला अत्तराचा सुगंध येऊ लागला आणि अकस्मात् वेगळीच ऊर्जा जाणवू लागली. ‘त्यांच्या चारचाकी गाडीतून ‘सगळीकडे चैतन्यदायी प्रकाश पसरत आहे’, असे मला जाणवत होते. हे सर्व मी वेगळेच अनुभवत होते.

३. आम्ही आश्रमातून निघत असतांना आम्हाला वैभवीताईने प्रसाद दिला.

४. मी आईला म्हणाले, ‘‘हा आश्रम नसून मंदिरच आहे.’’ ‘हे अद्भुत विश्व अनुभवायला दिले’, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

मी ही सूत्रे लिहित असतांना माझ्या शरिरावर रोमांच आले आणि माझी भावजागृती झाली.’

– सौ. स्नेहल सचिन हरणे, मालाड, मुंबई. (१७.११.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक