अमली पदार्थ विक्रीच्या मागे जिहादी षड्यंत्र आहे का ? याचा शोध घ्या !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर), ९ मार्च (वार्ता.) – हुपरी पंचक्रोशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि या परिसरात गेल्या काही काळात गांजा, इतर अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः युवकवर्ग मोठ्या प्रमाणात या व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून त्यांचे आरोग्य, शिक्षण यांवर, तसेच समाजाच्या नैतिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत आहेत. गांजा आणि अन्य अमली पदार्थ यांची अवैध विक्री अन् वितरण करणार्या टोळ्या सक्रीय असून यामुळे परिसरातील तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने समाजासाठी ते अत्यंत घातक आहे. तरी हुपरी आणि परिसरात वाढत चाललेल्या गांजा अन् अमली पदार्थाच्या विक्री-प्रसाराच्या विरोधात, तसेच त्यांना पाठीशी घालणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागे जिहादी षड्यंत्र असल्यास त्याचा शोध घ्यावा, या मागणीसाठी नेताजी सुभाषचंद्र चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
या विषयाच्या संदर्भात गत वेळी ज्यांनी मोर्चा काढला होता, आंदोलन केले होते, त्यांच्यावरच पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद केले असून ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशीही एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलन झाल्यावर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हासहमंत्री श्री. नीळकंठ माने, वस्ताद श्री. नेताजी निकम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश इंग्रोळे आणि उपाध्यक्ष श्री. नानासाहेब भोसले, अखिल भारतीय हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे, माजी सरपंच आप्पासाहेब देसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. गौरव नेमिष्टे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री आणि श्री. शिवानंद स्वामी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आंदोलनप्रसंगी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाचे श्री. श्रावण मुधाळे, अखिल भारतीय हिंदु महासभेचे शहरप्रमुख श्री. संजय पाटील, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री विक्रम सावंत, निखिल कांबळे यासंह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

आंदोलनातील मागण्या
१. गांजा आणि अन्य अमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्याच्या (अमली पदार्थावर नियंत्रण ठेवणारा कायदा) कलम ८ (विक्रीसाठी सिद्धता किंवा विक्री) आणि कलम २० (वाहतूक) अंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करावी. त्यांना पाठिंबा देणार्यांवर कलम २९ (सहभाग किंवा षड्यंत्र) अंतर्गत गुन्हे नोंद करावेत; तसेच या गुन्हेगारांना जे पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
२. अमली पदार्थांची पुरवठा साखळी उघडण्यासाठी ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्याच्या कलम २७ (साखळीशी संबंधित गुन्हे) अंतर्गत विशेष मोहीम राबवावी आणि ती साखळी पूर्णपणे नष्ट करावी.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी ! |
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !