जामखेड (अहिल्यानगर) येथील विराट हिंदु संमेलन !

अहिल्यानगर – भगवद्गीतेतही हे सांगितले आहे की, सनातन संस्कृती एक गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करत नाही. हिंसा कुणी करत असेल, तर ती सहन का करावी ? आपण आजपर्यंत अन्याय सहन करत आलो आहे, हे आपले दुर्दैव आहे. जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म, उर्वरित सगळे केवळ पंथ आहेत. अन्याय करणारे अधर्मी आहेत, असा धर्म असूच शकत नाही, असे परखड प्रतिपादन सरला बेट येथील पीठाधीश महंत रामगिरी महाराज यांनी या वेळी केले. जामखेड शहरात नुकतेच एका विराट हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाहक महेश करपे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘महिला शिवजन्मोत्सव समिती’च्या अध्यक्षा रोहिणी काशिद, तसेच तालुक्यातील हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बसस्थानकापासून जामखेड महाविद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
महंत रामगिरी महाराज म्हणाले की,
१. वक्फ बोर्डाने कह्यात घेतलेल्या भूमी आणि मालमत्ता सरकारने परत घ्याव्यात, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
२. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात समाजातील संत-महंतांनी स्वतःचा संप्रदाय, मठ आणि पोटजाती यांचा विचार न करता हिंदु धर्मासाठी संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला पाहिजे.
३. सनातन संस्कृती टिकवणे नव्हे, तर वाढवणे आपले दायित्व आहे. मुलांवर चांगले संस्कार करा, व्यसनापासून दूर रहावे. अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे, अन्यायाचा प्रतिकार करणे आपले काम आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याचे पालन का होत नाही ? ते पाहिले पाहिजे.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !