
‘धर्मशास्त्रे आणि श्रीमद्भगवद्गीता सिद्धांत सांगतात. त्यामुळे मानवात दृढता, खंबीरपणा आणि मूल्ये होती. त्याकरता प्राणांची आहुती देण्याची जिद्द होती. आज कुणाला शब्द फिरवण्यात संकोच वाटत नाही. तीच नीती झाली आहे. काव्य, साहित्य उच्छृंखल, उथळ झाले आहेत. इतिहास आता स्फूर्ती, प्रेरणा, चेतना द्यायला समर्थ नाही. तो केवळ एक संदर्भ उरला आहे. अमाप खप हेच श्रेष्ठतेचे अंतिम प्रमाण आहे.
आजचे धनाढ्य भ्रष्ट नेते समाजही विकत घेऊ शकतात. परदेशातील पैसा आमच्या राष्ट्राचा एक संपूर्ण प्रांत खरेदी करू शकतो. मानवाला त्याचा इतिहास आणि संस्कृती यांपासून तोडून त्यांचे वर्तमान हातपाय बांधून उभे केले आहे. आज पिस्तुल दाखवून माणसाचा आत्मा आपल्याजवळ ठेवता येतो. आता मानवहत्येची वार्ता ही काही बातमी राहिली नाही.
आजच्या अत्याधुनिक युगातील मानव सकाळी हत्येची बातमी वृत्तपत्रात वाचतो आणि रात्री उशिरा दूरदर्शनवर एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम पाहून निजतो. श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तसा आजचा अत्याधुनिक मानव तणावामध्ये जगतो अन् त्या ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव उद्दिष्ट मानतो.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !