
रत्नागिरी – जिल्ह्यात यावर्षी आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत ८० टक्क्यांनी घटल्याने आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. उत्पादनात घट होण्याची कारणे (दव, थंडी, कीड इ.) स्पष्ट करून तालुकानिहाय सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचा त्यांनी आदेश दिला आहे. बागायतदारांना अधिकाधिक हानीभरपाई मिळवून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पणन आणि कृषी मंत्र्यांसोबत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली जाईल. त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ. सामंत म्हणाले की,

१. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार असून असा उपक्रम राबवणारा हा राज्यातील पहिला जिल्हा असेल.
२. कोकण कृषी विद्यापिठाने आंबा, काजू, कोकम आणि फणस यांवर संशोधन करून फवारणीचे वेळापत्रक एक महिना आधी बागायतदारांना द्यावे.
३. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्ज देतांना शेतकर्यांना सिबिल स्कोअरच्या नावाखाली (कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आणि पत दर्शवणारे अंक) अडवणूक करणार्या बँकांवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे, तसेच त्यांची शासकीय खाती काढून घेण्यात येईल.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !