
अ. अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यामुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे.
आ. रशियातील साम्यवादाचा प्रयोग निष्फळ ठरून त्याचे घटक स्वतंत्र होऊन स्वतःच्या दारिद्र्याला मोठ्या कष्टाने तोंड देत आहेत.
इ. दक्षिण अमेरिकेतील अनेक राज्ये अमली पदार्थांचा (ड्रग्जचा) धंदा करून उदरभरण करत आहेत. याखेरीज तिकडे पुष्कळ दारिद्र्य ही समस्यासुद्धा आहेच.
ई. आफ्रिकेतील देशांत एकवाक्यता नाही. सांस्कृतिक गुलामगिरीच्या दडपणाखाली ते देश भरडले जात आहेत.
उ. मुसलमान राष्ट्र्रे इस्लामी म्हणून जरी एक असली, तरी शांतता, तितिक्षा, सहिष्णुता आणि सुसंस्कृतता या गोष्टींचा त्यांच्याकडे अत्यंत अभाव आहे. यामुळेच कराची पेटत आहे आणि अफगाणिस्तान जळत आहे. इराण-इराकमध्ये स्नेह नाही. सर्वांच्यातच अंतर्गत धुसफूस चालू आहे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ज्या तेलसाठ्यांच्या बळावर त्यांची मस्ती आहे, ते अनंत काळ टिकणारे नाहीत.
याखेरीज सार्या जगात बोकाळलेली गुंडगिरी, आतंकवाद, माफिया, लुटारूंच्या टोळ्या, त्यांची साम्राज्ये आणि यापायी सर्वत्र असुरक्षित झालेले जीवन, द्रव्याची अपरिमित लालसा, गुन्हेगारी, भयानक भ्रष्टाचार, शस्त्रास्त्रांची लयलूट, अशी सारी स्फोटक परिस्थिती आहे. त्यातच सार्या जगात बेकारीचीही समस्या आहे.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ ग्रंथातून)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !