
मुंबई – महाराष्ट्रातून वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत ११ सहस्र अग्नीवीर प्रशिक्षणासाठी गेले आहेत. यापैकी २५ टक्के म्हणजे २ सहस्र ७५० सैन्यदलात समाविष्ट होतील. उर्वरित ७५ टक्के म्हणजे ८ सहस्र २५० मुले परत राज्यात येतील. या अग्नीवीर तरुणांना राज्यातील पोलीस बलात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांना विधानसभेत दिली. याविषयीचा प्रश्न सदस्य आणि शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता.
मंत्री शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, अग्नीवीरांना राज्यातील विविध पोलीस बलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी समिती नेमली आहे. ७ एप्रिल २०२६ मध्ये या समितीच्या अभ्यासाचा कालावधी पूर्ण होऊन संबंधित अहवाल उपलब्ध होईल. अग्नीवीरांचा ‘बाँड’ म्हणजेच त्यांचा प्रशिक्षण आणि सेवा कालावधी वाढवणे हा देशपातळीवरचा निर्णय आहे. तो सैन्याने घेतलेला आहे. त्यात राज्यशासन पालट करू शकत नाही. राज्यात पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल, वन विभाग इत्यादी राज्यशासनाच्या कोणत्या बलांमध्ये समाविष्ट करता येईल, याविषयी संबंधितांच्या समवेत बैठक घेऊ. त्यातील निर्णय सामान्य प्रशासन विभागाशी अधिक संबंधित आहेत. व्यवसाय करणारे अग्नीवीरांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेतच.
याविषयी काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी सांगितले की, मोठ्या संख्येत युवक अग्नीवीरांचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणार आहेत. हरियाणा राज्याने याविषयी आधीच पावले उचलून त्यांच्या राज्यातील युवकांना राज्याच्या कोणत्या सेवांमध्ये समाविष्ट करता येईल, यासाठी पावले उचलली आहेत. युवक निरुद्योगी राहू नयेत, याची काळजी सरकारने घ्यावी.
– श्री. यज्ञेश सावंत, मुंबई
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात