
१. स्वतःचे घर सेवाकेंद्रासाठी देणे
‘वर्ष १९९९ आम्ही (मी आणि माझे यजमान सद्गुरु राजेंद्र शिंदे) ठाणे येथे प्रथमच शशिकांत राणे (आताचे कै. शशिकांत राणे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि श्रीमती क्षमा राणे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे) यांना भेटलो. त्याच वर्षी ‘साधकांना साधना आणि सेवा करता येण्यासाठी ठाणे येथील स्वतःचे घर सेवाकेंद्रासाठी देऊन ते दोघे गोवा येथील आश्रमात जात आहेत’, हे आम्हाला कळले. तेव्हा त्याविषयी आम्हाला आश्चर्य वाटून आनंद झाला. त्यानंतर त्यांचे ठाणे येथील घर सनातनचे सेवाकेंद्र झाले.
२. प्रेमभाव

काकू ठाणे सेवाकेंद्रात असतांना वेळात वेळ काढून आवर्जून काहीतरी गोड पदार्थ बनवून आम्हा साधकांना देत असत. ‘राणेकाका-काकू सेवाकेंद्रात आल्यावर घरातील मोठ्या व्यक्ती आल्या आहेत’, असे मला वाटत असे.
३. राणेकाकूंनी स्वतःला शिकायला मिळालेल्या गोष्टी इतरांना सांगणे
अ. काकू स्वयंपाकघरात सेवा करत असतांना त्यांच्याकडून मला स्वयंपाकातील नवीन गोष्टी शिकायला मिळत असत.
आ. वर्ष २००५ ते २००६ या कालावधीत मी ठाणे सेवाकेंद्रात रहात होते. त्या वेळी कधीतरी राणेकाका आणि काकू रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून ठाणे सेवाकेंद्रात येत असत. तेव्हा ते त्यांना रामनाथी आश्रमात शिकायला मिळालेली सूत्रे आम्हा सर्व साधकांना सांगत असत.
इ. काही वेळा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील बेकरीत सेवेला जात असे. त्या वेळी काकूंकडून मला विविध प्रकारची बिस्किटे, नानकटाई या पदार्थांविषयी सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळत असे. काकू आम्हाला सर्व साहित्य काटकसरीने वापरण्याविषयी सांगत असत.
४. जाणवलेला पालट
मी २ वर्षांनी ८.२.२०२६ या दिवशी काकूंना पाहिले. तेव्हा त्वरित माझ्या मनात विचार आला, ‘काकूंचा चेहरा तेजस्वी दिसत आहे.’
५. दुसर्या दिवशी, म्हणजे ९.२.२०२६ या दिवशी राणेकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेने मी राणेकाकूंविषयी लिहू शकले’, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (१०.२.२०२६)
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !