अशा प्रकारची बंदी घालणारे देशातील पहिले राज्य !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यात १६ वर्षांखालील मुलांसाठी सामाजिक माध्यमांच्या वापरावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक विधानसभेत राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतांना ही घोषणा केली. या निर्णयामुळे अशा प्रकारची संपूर्ण बंदी लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. यापूर्वी आंध्रप्रदेश आणि गोवा सरकार यांनीही मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर निर्बंध घालण्यावर विचार चालू असल्याचे संकेत दिले होते; मात्र कर्नाटकने या विषयावर सर्वप्रथम स्पष्ट आणि ठोस निर्णय घोषित केला.
Karnataka will ban social media use for children under 16, announced CM Siddaramaiah in the State Budget
If implemented, it will become the first state in India to take a clear step to restrict SM access for minors.
AP & Goa have earlier said they are considering similar… pic.twitter.com/cQslSzC6wr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 6, 2026
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मुलांमध्ये वाढत्या भ्रमणभाषच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक माध्यमांचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या वर्तनावर, शिक्षणावर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे.
ऑस्ट्रेलियानेही अलीकडेच १६ वर्षांखालील मुलांसाठी सामाजिक माध्यमांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न