
सिडनी (ऑस्ट्रेलिया) – येथे आयोजित चर्चासत्रात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. कार्नी म्हणाले की, मोदी यांचे त्यांच्या देशाप्रती असलेले समर्पण विलक्षण आहे. मागील २५ वर्षांत त्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आता देशाचे पंतप्रधान असतांना त्यांनी सातत्याने काम केले आहे.
कनाडा के प्रधानमंत्री मार्क कार्नी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व और शासन की कार्यशैली की सराहना की है।
उन्होंने कहा कि श्री मोदी आम नागरिकों को लाभ पहुंचाने पर विशेष ध्यान देते हैं और भारत के साथ संबंधों को और प्रगाढ़ करने की इच्छा भी जताई। pic.twitter.com/VVpIzBos23
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) March 5, 2026
कार्नी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी मांडलेली सूत्रे !
१. मोदी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी निवडणूक प्रचारासाठी जातात. त्यांच्या सभांना अडीच लाखांहून अधिक लोक उपस्थित असतात. मोदी यांचे संपूर्ण लक्ष ग्रामीण भागांतील लोकांच्या आवश्यकता पूर्ण करण्यावर असते.
२. मोदी यांनी ‘यूपीआय’द्वारे पैसे हस्तांतरणाची अशी व्यवस्था निर्माण केली आहे, जी कोणताही देश स्वीकारू शकतो. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही मध्यस्थाविना पैसा थेट जनतेच्या बँक खात्यांत पोचतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अपहाराला जागा रहात नाही.
३. कॅनडा भारताच्या ऊर्जा आवश्यकता पूर्ण करण्यात संपूर्ण सहकार्य करेल. आमचे आस्थापन ‘कॅमेको’ने भारताला युरेनियम पुरवठ्यासाठी दीर्घकालीन करार केला आहे.
४. भारत आणि कॅनडा यांच्यातील जुना संरक्षण करारात पालट करून नव्याने करार करण्याची प्रक्रिया चालू आहे.
५. अनुमाने २० लाख भारतीय वंशाचे लोक कॅनडात रहातात. दोन्ही देशांतील परस्पर आणि सांस्कृतिक संबंध अधिक बळकट होत आहेत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण