टिपू सुलतानने ४ लाख हिंदूंचे (त्यात मारलेले मेलेलेही होते) इस्लामीकरण केले. असंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या हिंदवी साम्राज्याविरुद्धही तो लढला. काही करू शकला नाही, तो भाग वेगळा. टिपूने त्याच्या पत्रांमध्ये अनेकदा नमूद केले आहे की, प्रदेश जिंकण्यापेक्षा ‘काफिरांना’ इस्लामच्या छत्राखाली आणणे त्याला अधिक महत्त्वाचे वाटते. त्याने मलबारच्या आपल्या सेनापतींना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट आदेश दिले होते, ‘जे इस्लाम स्वीकारणार नाहीत, त्यांना ठार मारावे.’ सय्यद अब्दुल दुलाईला १८ जानेवारी १७९० या दिवशी लिहिलेल्या पत्रात ‘अल्लाहच्या कृपेने मलबारमधील जवळजवळ सर्व हिंदूंना मुसलमान केले आहे. केवळ सीमेवरील काही जण शिल्लक आहेत, त्यांनाही लवकरच मुसलमान केले जाईल.’ बदरुझ झमान खानला १९ जानेवारी १७९० या दिवशी लिहिलेल्या पत्रात ‘मी अलीकडेच एका मोठ्या विजयाची प्राप्ती केली आहे, ज्यामध्ये ४ लाखांहून अधिक हिंदूंना मुसलमान बनवले’, असा उल्लेख करतो. ज्यात प्रेतांनाही मुसलमान बनवून दफन केले, असा उल्लेख आहे. कोडगू (कूर्ग) मध्ये त्याने एकाच दिवशी सहस्रो लोकांना बंदी बनवून त्यांचे सामूहिक धर्मांतर केले आणि ज्यांनी प्रतिकार केला, त्यांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली. याला त्याने ‘मजहबी’ विजय मानले.

टिपू बरा कसा म्हणायचा ?
हा नराधम छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गावरून चालत होता ? तो ब्रिटिशांविरुद्ध लढला, या एका कारणासाठी तो महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गावर चालणारा कसे बरा होतो ? त्याने छत्रपती शिवरायांप्रमाणे इंग्रजांविरुद्ध युद्ध केले, एवढाच संदर्भ आहे.
टिपू ज्या इंग्रजांविरुद्ध लढला त्यांचे साहाय्य छत्रपती शिवाजी महाराजांनीही मोंगलांविरुद्ध लढताना वेळप्रसंगी घेतले होती. मग महाराजांपेक्षा टिपू बरा म्हणायचा का ? छत्रपती शिवाजी महाराज यांचा दृष्टीकोन, ध्येय, राज्य करण्याची पद्धत, चारित्र्य हे सगळे पहाता महाराज आणि टिपू सुलतान यांची शतांशानेही तुलना होऊ शकत नाही.
– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा.
संपादकीय भूमिकाकुठे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य आणि कुठे हिंदूंवर पाशवी अत्याचार करणारे टिपू सुलतान याचे राज्य ? |

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?