
मुंबई – नागपूर येथील काही जिल्हा परिषदेच्या शाळांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी अनुदान प्राप्त केले. या प्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विभागीय अन्वेषण पूर्ण झाले असून शालेय शिक्षण विभागाकडून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर शिक्षण विभागाकडून लेखी उत्तर देण्यात आले.
वर्ष २०१४ पासून या शाळांना नियमबाह्य अनुदान देण्यात येत होते. वर्ष २०१७ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारे १२ शाळांनी बनावट कागदपत्रे सादर करून अनुदान लाटले. नागपूर शहर पोलीस ठाण्यात या शाळेतील पदाधिकार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !