
सांगली – इंदूर, मध्यप्रदेश येथील प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी अन् सनातन संस्थेचे प्रेरणास्रोत प.पू. रामानंद महाराज यांचे शिष्य आणि अध्यात्ममार्गावर निष्ठापूर्वक वाटचाल करणारे दौलतराव रामचंद्र लोंढे (वय ७१ वर्षे) यांचे १ मार्च या दिवशी सकाळी ६.१५ वाजता कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. विद्या लोंढे आहेत. लोंढे यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता सांगली येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुतणे श्री. जगदीश लोंढे यांनी मुखाग्नी दिला. ‘दिवंगत श्री. दौलतराव लोंढे यांना सद्गती मिळो’, अशी सनातन परिवाराकडून श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना.
दौलतराव लोंढे यांनी वर्ष १९९६ मध्ये प.पू. रामानंद महाराज यांच्याकडून नामदीक्षा (अनुग्रह) घेतली होती. तेव्हापासून त्यांनी आध्यात्मिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला होता. ते मूळचे कर्नाटक राज्यातील इंगळी येथील रहिवासी होते. काही काळापासून ते सांगली येथे वास्तव्यास होते. वर्ष २००३ मध्ये सांगली येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे सर्व दायित्व त्यांनी पार पाडले होते. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्याप्रती त्यांची नितांत श्रद्धा होती. सनातनचे साधक आणि सनातन संस्था यांच्याशी त्यांची अत्यंत जवळीक होती.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक