महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सावर्डे, सरंद (माखजन) विभागात मंदिर विश्वस्त बैठका संपन्न

रत्नागिरी – मंदिर संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन सातारा येथे मार्च महिन्यामध्ये होणार आहे. त्याची आणि मंदिर महासंघाच्या लढ्याला मिळत असलेले यश याची माहिती देण्यासाठी सावर्डे आणि सरंद (माखजन) विभागातील मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिरांचे पावित्र्य रक्षणाचा एक भाग म्हणून मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) फलक लावण्याचा निर्धार मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला.या बैठकीला महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री संजय जोशी आणि जिल्हा संघटक श्री सुरेश शिंदे उपस्थित होते.
१९ देवस्थानांचे ३५ मंदिर विश्वस्त
सावर्डे येथिल श्री भवानी मंदिरात आणि सरंद (माखजन) येथील श्री गणपती मंदिरात झालेल्या या बैठकांना कोकरे देवस्थानचे प्रमुख श्री परशराम दळवी, आबीटगाव देवस्थानचे श्री. दीपक शिर्के, निवळी देवस्थानाचे श्री. सुरेंद्र सुर्वे, तळवडे देवस्थानाचे श्री. नंदू विचारे, मावळंगे येथील अनिल मोरे, शिंदे आंबेरी येथील श्री. रविकांत शिंदे, आंबव पोंक्षे येथील श्री. प्रकाश पोंक्षे, बुरंबाड येथील श्री. संजय सहस्त्रबुद्धे, माखजन येथील श्री. नितीन सागवेकर यांच्यासह १९ देवस्थानांचे ३५ मंदिर विश्वस्त उपस्थित होते.

देवस्थानांच्या प्रतिनिधींचा विशेष सहभाग
मंदिरात राबवणारे उपक्रम ,वस्त्रसंहिता, सामूहिक आरती, मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत, याबाबतची माहिती श्री. सुरेश शिंदे यांनी दिली. यावेळी या बैठकीला सावर्डे देवस्थानाचे प्रदीप चव्हाण, कूटरे देवस्थानाचे श्री. विशाल परकर, ढाकमोली देवस्थानाचे श्री. राजेश लाड, वारेली देवस्थानाचे श्री. दीपक कदम या मंदिर विश्वस्तांनी बैठक आयोजनात विशेष पुढाकार घेतला.
क्षणचित्र
सावर्डे आणि सरंद येथील बैठकीत १३ देवस्थानांच्या प्रतिनिधींनी वस्त्रसंहिता फलकाची मागणी केली.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !