
बार्शी – शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. यामध्ये २२ भोंगे आणि ध्वनीक्षेपक काढण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ८ मशिदी आणि ५ मंदिरे यांवरील भोंग्यांवर ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी दोन गटांतील दगडफेकीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता समितीची बैठक घेऊन सामोपचाराने प्रश्न सोडवला आणि नियमबाह्य भोंगे काढण्याच्या सूचना दिल्या. (भोंगे काढण्यासाठी पोलिसांना एवढा अवधी का लागला ? पोलीस एखादी घटना घडल्यानंतरच कारवाई करणार का ? – संपादक) २८ फेब्रुवारी या दिवशी बारंगुळे प्लॉट, मंगळवार पेठ, खाजानगर, अमन चौक आणि एकविरा चौक आदी भागांतील धार्मिक स्थळांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीच्या वेळी १४ मशिदींपैकी ८ मशिदींवरील १४ भोंगे आणि ५ मंदिरांवरील ८ भोंगे काढण्यात आले. ही कारवाई शांततेत पार पडली असून ‘यापुढे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !