
रत्नागिरी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने चालू आहे. या विलंबामुळे अपघाताचा धोका उद्भवत आहे, तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याची नोंद घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित कंत्राटदार आस्थापनांना एकूण १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या आस्थापनांमध्ये ‘एच्.एम्.पी.एल्.’ आणि ‘ईगल’ आस्थापना यांचा समावेश आहे. महामार्गाचे २ महत्त्वाचे टप्पे वेळेत पूर्ण न केल्यामुळे या २ आस्थापनांना दंड ठोठावण्यात आला आहे. ‘प्रशासनाने या आस्थापनांवर केवळ दंड ठोठावून गप्प न बसता महाराष्ट्र महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुखकर प्रवास सुनिश्चित करावा’, अशी मागणी जनतेने केली आहे.
एच्.एम्.पी.एल्. आस्थापनावर ठोठावला ११ कोटी रुपयांचा दंड
एच्.एम्.पी.एल्. आस्थापनाकडे आरवली ते काटे या ३९ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाचे काम सोपवण्यात आले होते. या बांधकामाला अंदाजे ३११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता; मात्र त्याचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यावर या आस्थापनावर ११ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ईगल आस्थापनावर ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड
ईगल आस्थापनाकडे काटे ते वाकेड या ४९ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम करण्याचे दायित्व होते. या रस्त्याच्या बांधकामला अंदाजे ५१९ कोटी रुपयांचा खर्च होणार होता. या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने आस्थापनाला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !