|

मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वर्णनगरी जैसलमेर येथे जैन समाजाचा भव्य आध्यात्मिक युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसुरी यांच्या दिव्य चादर महामहोत्सव आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ मार्च या दिवशी या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. ८ मार्चपर्यंत श्रद्धा, तप आणि त्याग परंपरेचा उत्सव चालू रहाणार आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधानभवनात पत्रकार परिषदेत दिली. ‘हा आध्यात्मिक महोत्सव सामाजिक बंधुभाव आणि आस्था यांचे प्रतीक आहे’, असेही त्यांनी सांगितले.
Jaisalmer hosts the grand Jain Chadar Mahotsav, a powerful symbol of India’s cultural harmony.
Maharashtra Minister @MPLodha described it as a confluence of faith and unity, where 2,500 Sadhus, Saints & Mahants reflect on Vasudhaiva Kutumbakam.
871 years ago, during the… pic.twitter.com/ylLmQgEtvE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2026
मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा म्हणाले की,
१. प.पू. संरसंघचालकांच्या व्याख्यानाने समरसता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. महोत्सवात अनुमाने १ लाख भाविक सहभाग घेणार आहेत.
२. समरसता कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशभरातून विविध धर्म आणि पंथ यांचे २ सहस्र ५०० साधू, संत आणि महंत ‘वसुधैव कुटुम्बकम्’ यावर वैचारिक मंथन करणार आहेत.
३. खरतरगच्छाधिपती पू. श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन सान्निध्यात ८७१ वर्षांनंतर दिव्य चादरचे दर्शन महोत्सवात होणार आहे.
४. देशात या आयोजनाविषयी मोठा उत्साह असून सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. महोत्सवाच्या वेळी दादा गुरुदेवांशी संबंधित पवित्र चादर, चोल-पट्टा आणि अन्य ऐतिहासिक वस्तूंचे विशेष पूजन, आराधना, प्रवचन, भक्ती कार्यक्रम, ऐतिहासिक ५ किलोमीटरची शोभायात्रा, तसेच सामूहिक धार्मिक विधी आयोजित केले जातील.
५. हा महोत्सव समाजात धर्म, संयम, अहिंसा आणि सदाचार यांचा संदेश प्रसारित करील.

दिव्य चादरीचे वैशिष्ट्य !जैन श्वेतांबर समुदायाचे प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसुरी यांच्या ८७१ वर्षांपूर्वीच्या अग्नीसंस्कारांच्या वेळी त्यांचे शरीर भस्म झाले; मात्र त्यांचे पवित्र वस्त्र चादर, चोल-पट्टा आणि मुखपट्टी अक्षत राहिली. या अद्भुत आणि पवित्र चादरीच्या पूजनासाठीच चादर महोत्सव साजरा केला जातो. खरतरगच्छ समुदायासाठी हा महोत्सव अत्यंत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो. |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी