सात्त्विकतेची आवड असलेली ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील चि. अनघा महेश जाजडा (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अनघा महेश जाजडा ही या पिढीतील एक आहे !

फाल्गुन शुक्ल द्वादशी (२८.२.२०२६) या दिवशी चि. अनघा महेश जाजडा हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.  

चि. अनघा महेश जाजडा हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. अनघा जाजडा

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी  

‘मला गर्भारपणात पुष्कळ समष्टी सेवा करावी’, असे वाटत असे. मला धर्मशिक्षणवर्ग घेण्याची संधी मिळाली. मला नवरात्र उत्सवात दोन ठिकाणी प्रवचन करता आले.

२. जन्मानंतर

सौ. कीर्ती जाजडा

२ अ. जन्म ते ६ मास 

२ अ १. सहनशील : बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला ‘बीसीजी’ची लस दिली. तेव्हा बाळ जराही रडले नाही.

२ अ २. सात्त्विकतेची आवड : रात्री झोपतांना प.पू. भक्तराज महाराजांची भजने ऐकल्याविना चि. अनघा झोपत नाही.

२ आ. वय ६ मास ते १ वर्ष

२ आ १. देवाची आवड 

अ. आम्ही कर्पूर आरती करत असतांना तिला कर्पूर आरती ऐकायला आवडते. तिला घंटा वाजवायला आवडते.

आ. ती ८ – ९ मासांपासून श्री गणपति, श्रीकृष्ण आणि श्री दुर्गादेवी या देवतांची चित्रे पाहून लगेच ओळखते.

२ आ २. ती छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र अचूक ओळखते. त्यांचे छायाचित्र पाहून तिला पुष्कळ आनंद होतो. ती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष उत्साहाने करते.

२ आ ३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील छायाचित्र ती एकटक पहाते.

२ आ ४. सनातन-निर्मित कंदील आणि त्यावर छापलेले श्रीकृष्णाचे चित्र ती घरी येणार्‍या सर्वांना दाखवते.  

२ आ ५. अनघाला बाहेर नेल्यावर बरेच जण तिच्याकडे आकर्षित होतात.

२ आ ६. ‘तिला एवढ्या लहान वयात सनातनचे सद्गुरु आणि संत यांचे दर्शन घडले’, हे तिचे भाग्य आहे.

‘परात्पर गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला चि. अनघाची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली आणि त्यांनीच ती लिहून घेतली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. कीर्ती महेश जाजडा (चि. अनघाची आई), दिग्रस, यवतमाळ. (१५.१.२०२६)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक