
चेन्नई (तमिळनाडू) – भारतीय नौदलाची सागरी शक्ती वाढण्यासाठी नौदलाने पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आय.एन्.एस्. अंजदीप’चा नौदलात समावेश केला. उथळ पाण्यात कार्य करण्याची क्षमता असलेल्या ८ पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या मालिकेतील या तिसर्या युद्धनौकेचा २७ फेब्रुवारीला येथे नौदलात समावेश झाला. ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बनवलेली ही युद्धनौका ७७ मीटर लांबीची आहे. नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी या समारंभाला उपस्थित होते. कोलकात्यातील ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स’ या स्वदेशी आस्थापनाने ही युद्धनौका सिद्ध केली आहे.
‘अंजदीप’ची वैशिष्ट्ये !
१. मुख्य कार्य : ही युद्धनौका ‘डॉल्फिन हंटर’ म्हणून काम करण्यासाठी बनवण्यात आली आहे. तिचा प्राथमिक उद्देश किनारी भागात, म्हणजेच उथळ पाण्यात असलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा पाठलाग करून त्या नष्ट करणे आहे, हा आहे.
२. ‘अंजदीप’ नाव का ? : कर्नाटकामधील कारवार किनार्यावर असलेल्या अंजदीप बेटावरून ‘अंजदीप’ हे नाव या युद्धनौकेला देण्यात आले आहे.
३. लाभ : ही यद्धनौका देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमतांना बळकटी देईल आणि आयातीवरील अवलंबित्व अल्प करेल. अंजदीप हे नौदलाच्या त्याच नावाच्या जुन्या युद्धनौकेचे एक नवीन रूप आहे, जी वर्ष २००३ मध्ये निवृत्त झाली होती.
ही युद्धनौका जलद प्रतिसाद देतांना २५ नॉट्सचा वेग (४६.३ किमी प्रती घंटा वेग) गाठू शकते. ती विशेषतः समुद्री युद्ध वातावरणातील आव्हानांना तोंड देण्यासाठी बनवण्यात आली आहे. ही युद्धनौका नौदलातील आतापर्यंतचे सर्वांत मोठी ‘वॉटरजेट-प्रोपेल्ड युद्धनौका’ आहे. यामुळे समुद्रात खोलवर शत्रूचे धोके शोधून नष्ट करण्याची नौदलाची क्षमता वाढणार आहे. नौदलाच्या किनारी देखरेख आणि समुद्रात खाणकाम करण्याची क्षमतासुद्धा या युद्धनौकेमुळे वाढेल.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’