
१. स्थानिक क्रिकेट सामन्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्याची जमावाकडून हत्या
‘२७ एप्रिल या दिवशी मंगळुरू येथे स्थानिक क्रिकेटचा सामना चालू असतांना एका धर्मांधाने मैदानात घुसून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे चालू केले. त्याला उपस्थितांनी विरोध केला. शत्रूराष्ट्राचा जयघोष करणार्याविषयी भारतियांमध्ये स्वाभाविकपणे चीड निर्माण होते. त्यामुळे त्याला जमावाने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यात कुठलेही कटकारस्थान नव्हते. या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला.

२. आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत
या प्रकरणातील आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला. या निकालपत्रात न्यायमूर्ती म्हणतात, ‘आरोपीने मृत्यू पावलेल्याला लाथाबुक्याने मारले, असा आरोप आहे. त्यात त्याचा जीव घेण्याचा उद्देश नसतो. आरोपपत्रात २१६ साक्षीदारांचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या साक्षी आणि पुरावे नोंदवण्यासाठी, तसेच खटला पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे आरोपीला महिनोन्महिने कारागृहात ठेवणे योग्य नाही.’ या कारणांमुळे न्यायालयाने त्याला त्वरित जामीन संमत केला.

३. धर्मांधांच्या मानसिकतेला देशविरोधी शिकवण कारणीभूत
मंगळुरू येथे धर्मांधाने विनाकारण शत्रूराष्ट्र पाकिस्तानचे कौतुक केले आणि स्वत:चा जीव गमावला. या लोकांना शत्रूराष्ट्राचा एवढा पुळका कुठून येतो, हे पाहिले पाहिजे. त्यांना मशिदी आणि मदरसे येथील शिकवण कारणीभूत आहे, असे लक्षात येते. यासमवेतच त्यांच्या प्रत्येक दुष्कृत्याला पाठीशी घालणारी काँग्रेसही उत्तरदायी आहे, हेही तितकेच खरे !’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२२.२.२०२६)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !