
नाशिक, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील शंकराचार्य न्यास संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे २२ फेब्रुवारी या दिवशी दिवशी झालेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि भावविश्वात डुंबवणारा असा झाला. या सोहळ्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत, तसेच कुंभमेळा आयोजन समितीचे अध्यक्ष पू. भक्तीचरण दासजी महाराज, भाजपच्या नगरसेविका सौ. स्वाती भामरे, डॉ. किशोर गांगुर्डे, पुरोहित महासंघाचे श्री. सतीश शुक्ल यांसह हिंदुत्वनिष्ठ, अन्य दैनिकांचे संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
‘सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या अमूल्य मार्गदर्शनातून दिशा मिळाली’, असे वाचकांनी या वेळी आवर्जून सांगितले.
वाचकांचे मनोगतबांगलादेशासह जागतिक पातळीवर हिंदूंवर होणार्या अत्याचारांची वृत्ते दैनिकातून कळतात ! – श्रीकृष्ण साठे, उद्योजकप्रतिदिन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जो संदेश असतो, तो दिशादर्शक आणि विचारप्रवण करणारा असतो. बांगलादेशसह जागतिक पातळीवर हिंदुत्वाच्या संदर्भातील विशेषकरून हिंदूंवर होणार्या अत्याचाराची वृत्ते दैनिकातून कळतात, जी अन्य कुठे वाचायला मिळत नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून मला वाटणारी अस्वस्थता ‘सनातन प्रभात’ शेजारी ठेवून झोपल्यावर नाहीशी झाली आणि शांत वाटले. धर्म आणि देश यांचा विचार करणारे एकतरी दैनिक आहे, याविषयी अभिमान वाटतो ! – डॉ. किशोर गांगुर्डेअन्य दैनिकात हिंदु धर्माच्या बाजूने कुणी विशेष लिहीत नाही आणि बहुतांश लिखाण हे हिंदु धर्माच्या विरोधात असते. याउलट ‘सनातन प्रभात’ वाचणे चालू केल्यावर खरे वृत्त कसे असायला हवे ? ते कळले. ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही लिहिण्यास अन्य प्रसारमाध्यमे कचरतात. देवाचे वर्तनमानपत्र म्हणून आम्ही ‘सनातन प्रभात’ दैनिक घेतो. धर्म आणि देश यांचा विचार करणारे ‘सनातन प्रभात’सारखे एकतरी दैनिक आहे, याविषयी अभिमान वाटतो. |
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार