अहिल्यानगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे (संगीत अलंकार) यांच्या स्वरातील ‘भैरव’ रागाची पकड ऐकतांना साधकाला आलेल्या अनुभूती !

सौ. सीमंतीनी बोर्डे

१. ‘२८.१०.२०२५ या दिवशी मी अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथील सौ. सीमंतिनी बोर्डे (संगीत अलंकार) यांच्या स्वरात ध्वनीमुद्रित केलेली ‘भैरव’ रागाची पकड (टीप) ऐकली. ती ऐकल्यावर मला आनंद जाणवला.

टीप – रागाची पकड : रागाची अशी विशिष्ट स्वररचना किंवा स्वरांचा समूह, जो त्या रागाची ओळख लगेच करून देतो.

श्री. गुरुप्रसाद बापट

२. मी माझे डोळे बंद करून त्यांच्या स्वरातील पकड एकाग्रतेने ऐकत होतो. तेव्हा मला ‘पहाट आहे’, असे जाणवत होते. प्रत्यक्षात तेव्हा सायंकाळ होती ! सूर्यास्त झाला होता. त्यानंतर समजले की, राग भैरव हा पहाटे किंवा सकाळच्या प्रहरी गाण्याचा राग आहे.

३. मी ती पकड पुनःपुन्हा ऐकली. तेव्हा माझी मनःस्थिती चांगली झाली. मला मनःशांतीची अनुभूती आली.

 ४. ‘सौ. सीमंतिनी बोर्डे यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची कृपा अखंड आहे’, असा विचार माझ्या मनात आला.

‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक