हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सातत्यपूर्ण आंदोलनाला यश

अनकापल्ली (आंध्रप्रदेश) – शहरातील कुंचावरी रस्त्याच्या बाजूला गौरी-परमेश्वर मंदिराच्या शेजारीच ‘हलीम केंद्र’ नावाचे मांसाहार पदार्थ देणारे एक अनधिकृत उपाहारगृह चालू करण्यात आले होते. हे प्रकरण समोर येताच ते तात्काळ हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदु परिषदेचे नगराध्यक्ष सुरवरापाटी ताताजी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. अनेक दिवस हे आंदोलन चालू होते. महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने संबंधित अधिकारी अनंतम् कार्तिकेय यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने संबंधित उपाहारगृह हटवण्याचे आश्वासन देऊन त्याच्या विरोधात कारवाई केली.
🚩 Protests Yield Results in Anakapalli!
After sustained protests, action was taken against a non-veg “Haleem Center” operating beside the sacred Gowri-Parameswar Temple.
Kudos to local Hindutva organisations whose sustained protests compelled the administration to respond.… pic.twitter.com/2oITHRIBqJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 23, 2026
विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष द्वारापुडी परमेश्वर राव, हरे कृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दुर्लभ कृष्ण प्रेमदासजी, हिंदु जनजागृती समितीचे जे. जनार्दन, तसेच गुडीसा मुरली आणि इतर हिंदुत्वनिष्ठ यांच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले.
संपादकीय भूमिका
|
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक