पाश्चात्त्यांच्या अनुकरणाने हिंदु समाजाची झालेली हानी

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. ‘हिंदुस्थानातील हिंदु लोकांची दैनंदिन रहाणी आणि नित्यनैमित्तिक कर्मे यांतून कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी किंवा सदाचार नित्य आचरला जात असे. त्या आमच्या वाडवडिलांच्या आचाराचा आम्ही आज त्याग केला आहे.

२. आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा तुमचे पाश्चात्त्य गुरु अजूनही समजू शकत नाहीत’,  हे विसरू नका. मग त्या समस्या सोडवणे, हे तर फार दूरच ! हिंदु समाजाच्या समस्या सोडवणार्‍यांनी ‘त्यांच्या सुधारणांना धर्मशास्त्रांचे भक्कम अधिष्ठान असले पाहिजे’, हे ध्यानी घ्यावे.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’)