
पिंपरी (पुणे) – श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हा साधनेची, चिंतनाची आणि आध्यात्मिक अनुभूती देणारी जागा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखवणारी, पंचमवेद असणार्या ‘तुकाराम गाथे’ची निर्मिती केली. ही भूमी येथे येणार्या आशीर्वाद देणारी आहे. श्रीक्षेत्र भंडारा डोेंगर हा वारकरी संप्रदायातील एक प्रेरणादायी शक्तीस्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सहसरकार्यवाह श्री. अतुल लिमये यांनी व्यक्त केला. त्यांनी ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगरा’ला भेट देऊन तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिर निर्माण कार्याची पहाणी केली.
त्या वेळी लिमये यांचा ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट’चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या हस्ते पगडी आणि वीणा देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. अतुल लिमये पुढे म्हणाले की, अयोध्यानगरीत साकारण्यात आलेल्या प्रभु श्रीरामांच्या मंदिराचे शिल्पकारच तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्माणाचे कार्य करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भूमीत पाचवा वेद निर्माण झाला आहे. याच साधुसंतांच्या विचारांवर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ गेली १०० वर्षे समाजाचे संघटन आणि राष्ट्र पुनरुत्थानाचे कार्य करत आहे.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !