Bangladeshi Wanted In Cop’s Murder Arrested : बांगलादेशात हिंदु पोलीस अधिकार्‍याची हत्या करणार्‍या अहमद रजा याला देहली विमानतळावर अटक

गुंड अहमद रजा

नवी देहली – बांगलादेशात हिंदु पोलीस कर्मचार्‍याची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अहमद रजा हसन मेहदी याला देहली विमानतळावर कह्यात घेण्यात आले. आरोपी देहलीमार्गे युरोपला पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना स्थलांतर विभागाने त्याला पकडले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला बांगलादेशात परत पाठवण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. अहमद रजा हसन मेहदी याने वर्ष २०२४ मध्ये संतोष शर्मा नावाच्या हिंदु पोलीस अधिकार्‍याच्या हत्येचे दायित्व स्वीकारले होते.

५ ऑगस्ट २०२४ या दिवशी बनियाचांग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक संतोष शर्मा यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला होता. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर देशात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या काळात ही घटना घडली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून चालू झालेला हा उद्रेक पुढे अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचारात परिवर्तित झाला होता. या काळात हिंदूंवर आक्रमणे झाली आणि त्यांच्या पूजास्थळांची तोडफोड करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका 

हिंदु पोलिसाची हत्या करणार्‍या आरोपीला एक वर्षाने अटक होते, तर बांगलादेशी हिंदूंची हत्या करणारे आरोपी कधी पकडले जाणार ?