जळगाव येथील बेंडाळे महाविद्यालयातील इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील प्रकार
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

जळगाव – इयत्ता बारावीच्या परीक्षेला जातांना काही हिंदु विद्यार्थिनींना त्यांची ओढणी आणि ‘स्कार्फ’ काढण्यास भाग पाडण्यात आले; मात्र अन्य धर्मीय विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब घालून परीक्षेला बसू दिले.
या प्रकरणी बेंडाळे महाविद्यालयातील प्राचार्य आणि जळगावचे जिल्हाधिकारी यांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीने निवेदन दिले. निवेदनानंतर जिल्हाधिकार्यांनी ‘या प्रकरणाची पडताळणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल’, असे आश्वासन दिले. (केवळ आश्वासन नको, तर संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई व्हायला हवी ! जोपर्यंत अशी ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाठपुरावा घेणे आवश्यक आहे ! – संपादक)
झालेल्या प्रकाराविषयी महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. प्राचार्यांनी आश्वासन दिले की, संबंधित शिक्षकांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच त्यांना समज देण्यात येईल. महाविद्यालयात ओढणी घालण्याविषयी कोणताही अधिकृत नियम केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींवर कोणतेही बंधन लादले जाणार नाही.
‘विद्यार्थिनींशी कोणत्याही प्रकारचा धार्मिक, सांस्कृतिक किंवा वैयक्तिक वेशभूषेच्या आधारे भेदभाव होणार नाही, याची राज्यभरात कार्यवाही व्हावी’, अशी मागणीही या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केली.
ओढणी कचरापेटीत फेकून देण्याची शिक्षकांची भाषा !संबंधित शिक्षकांनी विद्यार्थिनींविषयी संतापजनक आणि अपमानास्पद विधान केले. ते म्हणाले होते, ‘‘परीक्षा असतांना ओढणी घालून यायची नाही, हे कळत नाही का ? ओढणी कचरापेटीत फेका !’’ (असे शिक्षक मुसलमान विद्यार्थिनींच्या संदर्भात वक्तव्य करण्यास का धजावत नाहीत ? हिंदु विद्यार्थिनींनी अशा वक्तव्यांच्या विरोधात स्वत:ही क्षात्रभावाने आवाज उठवला पाहिजे ! – संपादक) संपादकीय भूमिकाअशा प्रकारे अपमानास्पद विधान करणार्या शिक्षकांच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! |
संपादकीय भूमिका
|
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !