
१. स्पेन येथील ६६ वर्षीय झेवियर यांची पुष्कर ते तुळजापूर पदयात्रेची यशस्वी सांगता
‘स्पेन येथील बार्सिलोनामधील ६६ वर्षीय झेवियर यांनी नुकतीच राजस्थानातील पुष्कर ते महाराष्ट्रातील तुळजापूर अशी पदयात्रा केली. १४.१०.२०१५ या दिवशी त्यांनी पुष्कर येथील ब्रह्मदेवाचे दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ केला. ते नुकतेच तुळजापूरला पोचल्यावर त्यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा मंदिर संस्थानाकडून सत्कार करण्यात आला. त्यांचा प्रवास अनुमाने १ सहस्र ५०० किलोमीटरचा होता. अनेक हिंदु भाविक भक्तीभावाने ‘नर्मदा परिक्रमा’, ‘त्र्यंबकेश्वर महादेव’, ‘श्री दत्तगुरूंचे गिरनार’, ‘श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत’, अशा प्रदक्षिणा करत असतात. अशाच प्रकारे झेवियर यांनी प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता श्रद्धेने ही पदयात्रा यशस्वी केली. या प्रवासात त्यांनी साधी जीवनशैली स्वीकारून स्थानिकांशी संवाद साधला. या कालावधीत त्यांनी भारतातील १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम यात्राही पूर्ण केल्या. हिंदु धर्मावरील श्रद्धेपोटी एक अन्य धर्मीय विदेशी व्यक्तीने १० वर्षे श्रद्धेने प्रतिदिन अनुमाने २५ ते ३० किलोमीटर चालून पदयात्रा पूर्ण करणे प्रेरणादायी आहे.

२. हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे विदेशी नागरिकांना आकर्षण
या पदयात्रेचा उद्देश सांगतांना ते म्हणाले, ‘‘त्यांना भारतीय संस्कृती, देवता, नैसर्गिक सौंदर्य ज्यात देवतेचे अस्तित्व आहे, त्याचे दर्शन घ्यायचे होते.’’ हे ऐकल्यावर श्रीराम आणि रामसेतू काल्पनिक आहे, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणार्यांची कीव येते.
विदेशातील अनेक नागरिकांना भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्माची दैवी तीर्थक्षेत्रे यांनी भुरळ घातली आहे. त्यामुळे तेथील अनेक वलयांकित अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती, खेळाडू भारतातील तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतात. गेल्या वर्षी प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे पार पडलेल्या महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठीही सहस्रोच्या संख्येने त्यांनी गर्दी केली होती. अनेक जण हिमालयात आणि अन्य धार्मिक स्थळी जाऊन काही मास ते काही वर्षे उपासना करतात. अशाच एका झेवियर यांनी हिंदु धर्मावरील श्रद्धेपोटी १० वर्षे घालवून पुष्कर ते तुळजापूर पदयात्रा केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भगवंताला शरण जाऊन कृपा संपादित करणे आवश्यक आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१६.२.२०२६)
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !