देहली येथे १३ ते १५.१२.२०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्या ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनकक्ष लावण्यात आले होते. त्या प्रदर्शनांना आणि कार्यक्रमाला जिज्ञासूंचा पुढीलप्रमाणे प्रतिसाद मिळाला.
१. काही जिज्ञासूंनी सनातनच्या उत्पादनांचा प्रसार करणे
‘ज्यांनी पूर्वी सनातनची उत्पादने वापरली होती, अशा व्यक्ती वितरण कक्षावर आल्या होत्या. तेव्हा त्या ‘सनातनची उत्पादने शुद्ध, स्वस्त आणि पुष्कळ चांगली असतात. ही उत्पादने भेटवस्तू म्हणून देऊ शकता’, असे स्वतःहून इतरांना सांगत होत्या.
२. ‘साधना’ हा विषय ऐकल्यावर साधना आणि सेवा करण्यास उद्युक्त झालेले श्री. विशाल सिंह !
एक जिज्ञासू श्री. विशाल सिंह यांना ग्रंथप्रदर्शन कक्षावर ‘साधना’ हा विषय सांगितल्यावर त्यांना त्यात पुष्कळ रुची वाटली. त्यांनी अनेक ग्रंथही विकत घेतले. त्यांना धर्मशिक्षणवर्गात, तसेच अन्य कार्यात सहभागी व्हायचे आहे आणि सेवाही करायची आहे.
३. ‘भारत मंडपम्’च्या कर्मचारीवर्गावर पडलेला कार्यक्रमाचा प्रभाव !

‘कार्यक्रमाचे आयोजन, साधकांचे वर्तन आणि प्रदर्शन’ आदी पाहिल्यानंतर ‘भारत मंडपम्’च्या (कार्यक्रम स्थळावरील) कर्मचारीवर्गावर त्याचा चांगला प्रभाव पडला. त्यामुळे ते साधकांना इतर कोणत्याही ठिकाणी भेटल्यावर ‘जय श्रीराम’ म्हणून अभिवादन करत होते. काही कर्मचारी आपले मित्र आणि कुटुंबीय यांना प्रदर्शन पहाण्यास घेऊन आले होते.
४. श्री. अमित प्रताप सिंह, नोएडा महानगर संयोजक, परिवार प्रबोधन नोएडा, यांनी कार्यक्रमाचे केलेले कौतुक !
श्री. अमित सिंह म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम अत्यंत उत्तम आणि ज्ञानवर्धक होता. सनातन धर्म आणि संस्कृती यांसाठी समर्पित असलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करावे, तितके थोडेच आहे ! ‘सव्यसाची गुरुकुलम्’द्वारे सादर केलेली आत्मरक्षणाची प्रात्यक्षिके, शारीरिक व्यायाम आणि शस्त्रसंचालन’ यांचे उत्कृष्ट प्रदर्शन हे मंत्रमुग्ध करणारे अन् अभिमानास्पद होते.’’ (श्री. अमित सिंह यांनी अनेक ग्रंथ विकत घेतले. ते ‘नोएडा आणि देहली येथील सर्व शाळांच्या ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करू इच्छितात’, असे त्यांनी सांगितले. – संकलक)
– कु. सुमन सिंह (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २८ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तर प्रदेश. (३०.१२.२०२५)

समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !