‘डिसेंबर २०२५ मध्ये नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. त्यानिमित्त साधिकेला सुचलेल्या प्रार्थना पुढे दिल्या आहेत.
१. सप्तर्षी आणि सर्व देवता, आपण सर्वांनी नवी देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित राहून सूक्ष्मातून सर्व साधकांच्या भोवती संरक्षककवच निर्माण करावे. हा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे. अनिष्ट शक्तींच्या स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील आक्रमणांपासून सर्व साधकांचे रक्षण होऊ दे.
२. हे सूर्यदेवा, तुझ्या तेजस्वी किरणांनी महोत्सवाभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे आणि वाईट शक्तींचा नाश होऊ दे.
३. हे निसर्गदेवते, शंखनाद महोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी तुझी अखंड कृपा राहू दे.

४. हे श्रीकृष्णा, तुझ्याविना शंखनाद महोत्सव पार पडणे असंभव आहे. तूच विविध रूपांतून कार्यक्रमाचे रक्षण कर.
५. हे श्रीकृष्णा, आमच्या गुरुदेवांना अपेक्षित असा कार्यक्रम तूच आमच्याकडून करून घे. देवा, गुरुदेवांचे ध्येय फार मोठे आहे. श्रीकृष्णा, तूच आता साधकांच्या साहाय्यासाठी लवकर धावत ये. साधकांना सेवेतील अडथळ्यांतून मार्ग काढता येऊ दे.
६. हे श्रीकृष्णा, शंखनाद महोत्सवासाठी विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ, अर्पणदाते, वाचक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने येऊ देत अन् सर्व विश्व सनातनमय होऊ दे.
७. हे श्रीकृष्णा, आतंकवादी, समाजद्रोही, राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही या सर्वांपासून या कार्यक्रमाचे रक्षण होऊ दे. या कार्यक्रमात कुठलीही बाधा येऊ देऊ नकोस. या कार्यक्रमाची फलनिष्पत्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी होऊ दे.’
– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२५)

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !