
नवी देहली – भारतामधील देशी गायीच्या शेणाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या शेणाचा अनेक वर्षे केवळ ग्रामीण भागांत पारंपरिक गोष्टींसाठी वापर होत असे. तथापि आता नैसर्गिक शेती, जैविक खत आणि पर्यावरणपूरक उत्पादने म्हणून याची मागणी वाढली आहे. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कुवैत यांसारख्या शुष्क हवामान असलेल्या देशांमध्ये खजुराच्या शेतीसाठी हे शेण अत्यंत उपयुक्त आहे. याखेरीज ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, मालदीव आणि सिंगापूर यांसारख्या देशांमध्येही शेणाची मागणी वाढत आहे.
जागतिक स्तरावर शेण आणि त्यापासून बनवलेले जैविक खत, ‘कंपोस्ट’ (सेंद्रिय पदार्थापासून बनवलेले) खत यांसारखी उत्पादने जागतिक बाजारपेठेत सहस्रो कोटी रुपयांना विकली जात आहेत. प्रति किलो ताज्या शेणाला बाजारात मोठी किंमत आहे. या शेणाचा व्यापार देशासाठी एक महत्त्वाचा निर्यात स्रोत बनत आहे. सेंद्रिय खतांमध्ये गायीच्या शेणातील नाइट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक लाभदायी ठरतात. भारतात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्यामुळे प्रतिदिन शेणाची निर्मिती अत्यधिक आहे. त्यामुळे निर्यातीसाठी शेणाची पुरेशी उपलब्धताही आहे.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !