‘सीसीटीव्ही’मुळे प्रकार उजेडात !

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानाअंतर्गत शिक्षण विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर चालू असलेला कॉपीचा सुळसुळाट सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे उघडकीस आला आहे. तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
इयत्ता १२ वीचा इंग्रजी विषयाची परिक्षा चालू असतांना राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतपूर येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी निर्भयपणे एकमेकांच्या उत्तरपत्रिका पहात, झेरॉक्स प्रतींचा वापर करत कॉपी करत होते. हे सर्व प्रकार पर्यवेक्षकांच्या समोर चालू होते. तक्रारीनंतर भरारी पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळले असता संपूर्ण अपप्रकाराचे धक्कादायक चित्र स्पष्ट झाले.
प्रशासनाचा कडक पवित्रा !
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेले पर्यवेक्षक आणि बैठे पथकातील अधिकारी यांच्याविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. खासगी संस्थांशी संबंधित कर्मचार्यांवर त्यांच्या संस्थांच्या वतीने शिस्तभंगात्मक आणि कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे, तसेच सदर केंद्रावरील परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी केंद्र संचालकांसह १९ जणांचा ताफा तात्काळ पालटून त्या ठिकाणी नवीन कर्मचार्यांची नियुक्ती या प्रशासनाने केली आहे.
संपादकीय भूमिकाकॉपी करू देणार्यांना केवळ निलंबित करून न थांबता त्यांना कठोर शिक्षाही होणे आवश्यक आहे ! |
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !