(परस्पर व्यापार करार म्हणजे व्यापारात सहभागी दोन्ही देशांना परस्परपूरक आणि नफा देणारा व्यापार करार. यांतर्गत उभय देश एकमेकांसाठी आयात कर अल्प करतात.)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका आणि बांगलादेश यांनी परस्पर व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने बांगलादेशी निर्यातीवरील परस्पर कर २० टक्क्यांवरून १९ टक्क्यांपर्यंत अल्प केला. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी एका निवेदनात म्हटले की, अमेरिकेने ‘अमेरिकेचा कापूस आणि मानवनिर्मित धागे यांचा वापर करणार्या बांगलादेशातील वस्त्रोद्योगांसाठी एक यंत्रणा स्थापित करू’, अशी वचनबद्धता दर्शवली आहे. यामुळे अमेरिकी बाजारात आमच्या उत्पादनांवर शून्य कर लागू होईल.
दुसरीकडे ‘व्हाईट हाऊस’नुसार बांगलादेश अमेरिकी निर्यात, विशेषतः सोयाबीन, मका, नागरी विमाने आणि वाहनांसाठी त्यांची बाजारपेठ खुली करण्यात सहकार्य करेल.
अमेरिकेचे राजदूत जेमिसन ग्रीर म्हणाले की, बांगलादेशासमवेत पारस्परपूरक व्यापारावरील करारावर स्वाक्षरी करणे, हे दक्षिण आशियातील पहिले उदाहरण आहे.
व्यापार करारातून बांगलादेशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकले ! – तज्ञया परस्पर व्यापार करारावर लेखक आणि व्यापार विषयक तज्ञ नवरूप सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बांगलादेशाने अशा प्रकारचा व्यापार करारकरून अमेरिकेसमोर गुडघेच टेकले आहेत. हे निवळ आत्मसमर्पण आहे. भारताने अमेरिकेसमवेत जो करार केला, त्यात त्याने स्वत:च्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचे संरक्षण केले, परंतु बांगलादेशाने तसे केले नाही. |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman