‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे ८.१०.२०२५ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुत्तणी शहरापासून १२ कि.मी. दूर असलेल्या नल्लातुरू गावातील ‘श्री वीरमंगल आंजनेय मंदिरा’त जाऊन विशेष पूजा केली, तसेच हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हनुमंताला प्रार्थना केली.

हे मंदिर कांचीपूरम् या शहरापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. मंदिर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमेवर असलेल्या ‘कुशस्थळी’ नदीच्या काठी आहे. ‘यवनांपासून हिंदूंना धोका आहे’, हे ओळखून १५ व्या शतकात थोर संत श्री व्यासराजतीर्थ यांनी संपूर्ण दक्षिण भारतात भ्रमण करून ७३२ उत्तराभिमुख ‘वायुमारुतीं’ची स्थापना केली. त्यांपैकी हे एक मंदिर आहे.

१. श्री वीरमंगल आंजनेय मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट्य
मारुति उत्तरेला तोंड करून उभा आहे. त्याचा एक हात अभय मुद्रेत आहे आणि दुसर्या हातात ‘सौगंधिका’ (सोनटक्का) हे पुष्प आहे, तसेच त्याचे शेपूट वरच्या दिशेला असून त्या शेपटाला एक घंटी बांधलेली आहे.

२. हनुमंत, भीम आणि मध्वाचार्य या तिघांच्या रूपातील ‘वायुमारुति’!
हनुमंत हा वायुपुत्र आहे, तसेच भीम आणि १३ व्या शतकातील द्वैत सिद्धांताचे प्रतिपादक मध्वाचार्य हेही वायुपुत्र आहेत. श्री व्यासराजांनी मारुतीच्या मूर्तींची स्थापना करतांना हनुमंत, भीम आणि मध्वाचार्य, या तिघांच्या रूपात ‘वायुमारुति’ या संकल्पनेला जन्म दिला. त्यामुळे प्रत्येक मारुतीच्या हातात सौगंधिका हे पुष्प आहे. हे पुष्प आपल्याला महाभारतातील सौगंधिका पुष्प आणायला गेलेल्या भिमाची आठवण करून देते. मारुतीच्या शेपटीला बांधलेली घंटा मध्वाचार्यांशी संबंधित आहे. मध्वाचार्य हे एकांतात श्रीरामाची पूजा करतांना नेहमी घंटानाद करायचे. अशा प्रकारे ‘वायुमारुती’मध्ये श्री व्यासराजतीर्थांनी हनुमंत, भीम आणि मध्वाचार्य यांचा समावेश केला आहे.
३. १४ व्या शतकातील थोर संत श्री व्यासराजतीर्थ !
कर्नाटकातील मैैसुरूजवळील बन्नुरू गावात वर्ष १४६० मध्ये थोर संत श्री व्यासराजतीर्थ यांचा ‘यतिराज’ या नावाने जन्म झाला. वर्ष १४७८ मध्ये ते पूर्वादि मठाचे मठाधिपती झाले. त्यानंतर अनेक वर्षर्े कर्नाटकातील मुळबागिलू आणि तमिळनाडूतील कांची येथे राहून त्यांनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. पुढे साळूवा चक्रवर्ती नरसिंह राजाने त्यांना राजगुरु म्हणून नेमले. राजाने वर्ष १४८६ मध्ये श्री व्यासराजतीर्थ यांच्याकडे तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराचे दायित्व सोपवले.
३ अ. श्रीकृष्णदेवराय यांच्यावर कुहुयोग (मृत्यूगंडांतर) आल्याने श्री व्यासराजतीर्थ यांनी त्याला राज्य दान करण्यास सांगून स्वतः अडीच वर्षे सिंहासन सांभाळणे : इसवी सन १५०९ मध्ये श्रीकृष्णदेवराय विजयनगर साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. जेव्हा ‘ग्रहगतीप्रमाणे श्रीकृष्णदेवराय यांच्यावर कुहुयोग (मृत्यूगंडांतर) आला आहे’, असे समजले. तेव्हा श्री व्यासराजतीर्थ यांनी राजाला सर्व राज्य त्यांना दान करायला सांगितले. अडीच वर्षे श्री व्यासराजतीर्थ यांनी सिंहासन सांभाळले आणि राज्य केले. कुहुयोगाच्या शेवटी एक कालसर्प सिंहासनाजवळ आला. तेव्हा श्री व्यासराजतीर्थ यांनी त्याच्यावर त्यांचे भगवे उपरणे टाकले. त्या वेळी वस्त्रासहित कालसर्पही भस्म झाला. दुसर्या दिवशी राजाला राज्य हस्तांतरित करून श्री व्यासराजतीर्थ देशाटनाला गेले.

३ आ. यवनांपासून हिंदूंना असलेला धोका ओळखून श्री व्यासराजतीर्थ यांनी ७३२ उत्तराभिमुख ‘वायुमारुतीं’ची स्थापना करणे : ‘यवनांपासून हिंदूंना धोका आहे’, हे ओळखून श्री व्यासराजतीर्थ यांनी संपूर्ण दक्षिण भारतात भ्रमण करून ७३२ उत्तराभिमुख ‘वायुमारुतीं’ची स्थापना केली. असे म्हटले जाते की, श्री व्यासराजतीर्थ हे भक्त प्रल्हादाचे अवतार होते. ‘श्री विजयिंद्र तीर्थ, कनकदास, पुरंदरदास आणि हरिदास’, यांसारख्या संतांचे ते गुरु होते. अनेक राजांनी त्यांना राजगुरु मानले होते. श्री व्यासराजांनी वर्ष १५३९ मध्ये ९१ व्या वर्षी हंपी येथे तुंगभद्रा नदीच्या काठी समाधी घेतली. ‘श्री व्यासराजतीर्थ हेच मंत्रालयम्च्या श्री राघवेंद्रस्वामींच्या रूपात वर्ष १५९५ मध्ये जन्माला आले’, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
४. वीरमंगल हनुमंताच्या चरणी प्रार्थना !
‘हे आंजनेया, कलियुगात ज्या ज्या वेळी सनातन हिंदु धर्मावर यवनांची आक्रमणे झाली, त्या त्या वेळी तू हिंदूंचे रक्षण केलेस, तसेच हिंदूंना बळ आणि धैर्य दिलेस अन् हिंदूंमध्ये वीरश्री आणि क्षात्रभाव जागृत केलास. सांप्रत कलियुगात धर्मरक्षणासाठी आम्हाला बळ दे अाणि सर्व प्रकारच्या आक्रमणांपासून आमचे रक्षण कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), कांचीपूरम्, तमिळनाडू. (१२.१०.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?