
पणजी (गोवा), ५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा पुस्तक महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
#GoaBookFestival2026@SanatanSanstha's Stall Draws Big Crowds at Goa Book Festival!
🎁 Governor Pusapati Ashok Gajapathi Raju presented Sanatan books
🎉 Festival inaugurated by CM Pramod Sawant
👀 PWD Minister Digambar Kamat shows keen interest
🔹 Books on 🕉️ Sadhana,… pic.twitter.com/4Jg1Nmnyh3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 5, 2026
सकाळच्या सत्रात प्रामुख्याने राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रदर्शनस्थळी भेट देत असून दुपारनंतर अन्य नागरिक भेट देत आहेत.
या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन ४ फेब्रुवारी या दिवशी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.
📍Bhausaheb Bandodkar Ground, Panjim
Goa to Read with Enthusiasm!
Pleased to inaugurate the Goa Book Festival, organised by the National Book Trust, in Panaji in presence of distinguished dignitaries.
With its theme “Ocean of Stories”, the festival celebrates Goa’s rich… pic.twitter.com/K3Oc1mmNFP
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) February 4, 2026
सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात साधनेत प्रगती करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ, श्रीकृष्ण, श्रीराम, श्री गणेश, देवी आदी देवतांविषयक शास्त्रीय माहिती; कुटुंबातील कलह निवारण, संस्कारक्षम बालसंस्कार आणि धर्मशिक्षण यांसारख्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन आणि विक्री चालू आहे. ‘जीवन कसे जगावे ?’, ‘साधना कशी करावी ?’, ‘तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाचे रहस्य काय ?’, याविषयीची सुबोध, विज्ञानाधिष्ठित आणि आचरणात आणता येईल, अशी माहिती या ग्रंथांमध्ये देण्यात आली आहे. सनातनचे ग्रंथप्रदर्शन प्रतिदिन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी असणार आहे. या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.
सनातन संस्थेकडून गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांना ग्रंथ भेट

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी भेट दिली. या वेळी राज्यपाल सनातनच्या प्रदर्शनकक्षाजवळ आल्यानंतर त्यांना सनातनच्या साधिका संगीता नाईक यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती दिली.
📚✨Sanatan Sanstha showcased a vibrant confluence of knowledge, Dharma & culture at the Goa Book Festival – featuring inspiring reads on spirituality, Ayurveda, personality development, nurturing values in children, and much more.
Making the moment special, Hon’ble Governor of… pic.twitter.com/ibef5bj9Kk
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 5, 2026
या वेळी राज्यपालांसमवेत ‘नॅशनल बूक ट्रस्ट’चे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, ‘दैनिक तरुण भारत’चे गोवा आवृत्तीचे संपादक श्री. सागर जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी राज्यपालांनी ग्रंथाविषयीची माहिती जाणून घेतली. सनातन संस्थेच्या वतीने राज्यपालांना सनातनचा ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, हा इंग्रजी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनीही सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला ५ फेब्रुवारी या दिवशी भेट दिली.
Hon’ble Public Works Minister Shri. Digambar Kamat (@digambarkamat) visited the Sanatan Sanstha stall at the Goa Book Festival, spending time engaging with the grand display showcasing inspiring collections on spirituality, Ayurveda, personality development, nurturing values in… pic.twitter.com/SBSGLFMjU3
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 5, 2026
या वेळी सनातनच्या साधिका संगीता नाईक यांनी त्यांना ग्रंथांविषयी दिलेली माहिती त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतली.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !