
वर्ष २०१४ मध्ये ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या नावाने एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो नुकताच एका दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला. यात अभिनेते सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, विक्रम गोखले आणि विनय आपटे असे दिग्गज कलावंत होते. चित्रपटाचा आशय हा एक खोटे स्वामी सिद्ध करून त्यांच्या नावावर एक ‘पब्लिक लिमिटेड कंपनी’ स्थापन करून लोकांना कसे लुबाडता येईल, या विषयावर पूर्णपणे बेतलेला आहे. यात स्वामी हे पात्र अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेले आहे. लोक त्याच्या स्वामीत्वाला भुलून भूमी आणि पैसा त्यांना अर्पण करतात. अर्थात् हिंदु धर्माच्या श्रद्धेशी एक फार मोठा खेळ इथे खेळल्याचे दाखवण्यात आले आहे.

खरेतर अनेक मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आणि ख्रिस्ती पाद्री हे लोकांना वेगवेगळ्या मार्गाने लुबाडत असतात, कैक वेळा स्त्रियांवर अत्याचार करतात, याविषयीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतही असतात; परंतु त्या विषयावर चित्रपट करावा, असे धाडस कोणत्याही निर्मात्याचे झाले नाही; कारण तसे दाखवल्यास होणार्या परिणामांची पूर्ण कल्पना त्यांना असते. सनातन हिंदु धर्माला संत आणि ऋषिमुनी यांची फार मोठी परंपरा आहे अन् अद्यापही ती चालू आहे. उलटपक्षी हिंदूंच्या देवस्थानांचे सरकारीकरण झाल्याने मंदिरात हिंदूंनी अर्पण केलेला पैसा हा अनेक लोकोपयोगी कार्यासाठी वापरला जातो, तसेच त्याचा यथेच्छ अपलाभ अल्पसंख्यांकासाठी केला जात आहे. इतर पंथियांच्या प्रार्थनास्थळांकडून मात्र एक पैसाही हिंदूंसाठी वा लोकोपयोगासाठी वापरला जात नाही, हे विशेष. असे असतांना चित्रपटातून एक खोटे स्वामी उभे करून लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा दाखवला जाणे, याचाच अर्थ हिंदु म्हणावे तितके जागृत झालेले नाहीत. याकरताच सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई. (२.२.२०२६)
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
भारतीय वाद्यांचा नाद ऐकल्यावर त्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !