काँग्रेसचे ७, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका खासदाराचा समावेश

नवी देहली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता चालू झाले; परंतु केवळ ८ मिनिटेच चालू शकले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची प्रक्रिया अनेक वेळा झाली. संसदेत चर्चेच्या वेळी काही खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले. या अनुशासनहीनतेमुळे काँग्रेसचे ७, तर माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाचा १ अशा ८ खासदारांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, घोषणा देणे चुकीचे आणि नियमांविरुद्ध आहे. तरीही विरोधकांनी गदारोळ चालूच ठेवला होता. या वेळी कारवाई करत कागद भिरकावणार्या ८ खासदारांना निलंबित करण्यात आले. यात मणिकम टॅगोर, गुरजीत औजला, राजा वडिंग, हिबी ईडन, किरण रेड्डी, प्रशांत पोडोले, वेंकट रमन आणि डीन कुरियोकोज यांचा समावेश आहे. निलंबित केल्यावरून या खासदारांनी संसद परिसरात विरोध प्रदर्शन केले.
सभागृहाचे कामकाज कोणत्याही व्यत्ययाविना चालावे, यासाठी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस आणि भाजप खासदारांसमवेत गदारोळावरून बैठक घेतली. सभागृहाबाहेर विरोधी खासदारांनी अमेरिका-भारत व्यापार करारावरूनही घोषणा दिल्या.
संपाकीदय भूमिकाजे खासदार लोकसभा अध्यक्षांचा आदर करत नाहीत, ते सामान्य लोकांना कशी वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! |
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’