
१. अपघातामध्ये पायाच्या घोट्याचे हाड सांध्यातून निखळल्याने पुष्कळ शारीरिक त्रास होणे आणि ‘प्रत्येक क्षणी प.पू. गुरुदेव समवेत असून तेच बळ देत आहेत’, याची जाणीव होणे
‘मार्च २०२५ मध्ये मी दुचाकी गाडीवरून पडून माझा अपघात झाला होता. त्यामध्ये माझ्या उजव्या पायाच्या घोट्याचे हाड सांध्यातून निखळले होते. मला जेव्हा हे कळले, तेव्हा मी स्थिर होते आणि देवाकडे बळ मागत होते. माझ्यावर २ – ३ रुग्णालयांत वेगवेगळे उपचार झाले. मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होते; पण ‘प्रत्येक क्षणी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत आणि तेच मला बळ देत आहेत’, याची मला जाणीव होत होती.
२. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सांगितल्यावर मनावर ताण येणे आणि त्या स्थितीत आईने धीर देणे
तीन सप्ताह माझा पाय ‘प्लास्टर’मध्ये होता; पण त्याचा उपयोग न झाल्यामुळे आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. तेव्हा मला ताण येत होता, तसेच वाईटही वाटत होते. त्या वेळी माझ्या आईने ‘प्रत्येक वेळी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये श्री गुरुमाऊली आपल्या समवेत आहे’, असा विचार कर’, असे सांगून मला भावाच्या स्तरावर रहाण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले. तिने मला प्रत्येक वेळी आधार दिला.
३. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी नामजपादी उपाय दिल्याने अवघड शस्त्रकर्मामुळे होणारा त्रास उणावणे

देवाच्या कृपेने माझे अवघड असे शस्त्रकर्म सुलभतेने पार पडले. माझ्या पायाला १२ टाके पडले होते. त्यामुळे मला त्याचा त्रास होत होता; मात्र सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे मला त्रासाची तीव्रता जाणवत नव्हती. या सर्व परिस्थितीत देवाच्या कृपेनेच मला सकारात्मक रहाता आले.
४. आई-वडिलांनी साहाय्य केल्याने शस्त्रकर्मानंतर लवकर चालता येणे आणि त्यामुळे अस्थीरोग तज्ञांनीही कौतुक करणे
शस्त्रकर्मानंतर चालण्याचा सराव करतांना मला पुष्कळ त्रास होत होता; पण आई-बाबा मला वेळोवेळी चालायला लावायचे. अस्थीरोगतज्ञ मला म्हणाले, ‘‘शस्त्रकर्मानंतर इतर रुग्ण साडेतीन मासांनंतर चालू शकतात; पण तुमची अडीच मासांत पुष्कळ प्रगती आहे. नाहीतर आणखी एक छोटेसे शस्त्रकर्म करावे लागले असते.’’ देवाच्या कृपेने तसे काही झाले नाही. शस्त्रकर्मानंतर साडेतीन मासांतच मी नोकरीच्या ठिकाणी, म्हणजे पुण्याला आले. माझ्या सहकार्यांनाही मी लवकर आलेले पाहून पुष्कळ आश्चर्य वाटले.
कृतज्ञता : ‘केवळ भगवंताची कृपा असल्यामुळेच मी या सर्व परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडू शकले. त्याबद्दल जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. साक्षी संतोष रुद्रकंठवार, पुणे
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !