गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) !
(वेब सिरिज म्हणजे ऑनलाईन प्रसारित करण्यात येणारी मालिका)
मुंबई : ‘झी ५’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ (मनोरंजनात्मक कार्यक्रम पहाण्याची व्यवस्था) वरील ‘देवखेळ’ या ‘वेब सिरिज’च्या ‘टीझर’मधून (चित्रपटाच्या संक्षिप्त भागामधून) गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या शंकासुर या स्थानिक देवाविषयी अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारा भाग प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ‘गुहागर बार असोसिएशन’चे अध्यक्ष आणि ‘आपलं गुहागर’चे समन्वयक संकेत अरुण साळवी यांनी गुहागर पोलीस ठाण्यात बी.एन्.एस्. आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

या संदर्भात ‘सध्या चालू असलेले ‘प्रोमो’ (प्रसिद्धीचे छोटे व्हिडिओ) तात्काळ हटवा अन्यथा कार्यालयापर्यंत येऊ’, अशी चेतावणी गुहागरमधील नागरिकांनी दिली आहे.
🚨 Devkhel Outrage | Faith Under Attack 🚨
⚠️ Because Hindus are seen as silent, mockery feels consequence-free. That mindset must END.
A complaint has been filed at Guhaghar Police Station over a Marathi web series promo that insults the revered Shankasur Devta 🙏
Portraying… pic.twitter.com/4E18cJtZYz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 31, 2026
या मालिकेच्या ‘टीझर’मध्ये शंकासुर या स्थानिक देवतेला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः ‘शंकासुर शिक्षा करतो, बळी घेतो’, ‘होळीत प्रतीवर्षी येथे हत्या करण्याची प्रथा आहे’, अशा संवादांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. शंकासुर देव हे गुहागर परिसरातील प्राचीन श्रद्धास्थान असून शिमगोत्सवाच्या काळात सहस्रो भाविक श्रद्धेने उपासना करतात.
२१ जानेवारी २०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेले विज्ञापन आतापर्यंत ८ लाखांहून अधिक दर्शकांनी पाहिले आहे. हा आक्षेपार्ह व्हिडिओ देशभर प्रसारित झाला आहे. या प्रकरणामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही तक्रारीत पुढे म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदू निद्रिस्त असल्यामुळेच कुणीही उठतो आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करतो. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे ! |

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !