
वाई (सातारा) २९ जानेवारी (वार्ता.) – प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीमती विजयाताई वसंतराव भोसले (वय ९० वर्षे) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, २ मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, त्याचप्रमाणे प्रतापगड उत्सव समितीचे कार्यकर्ते असा परिवार आहे.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे शाळेतून त्यांचे नाव काढून टाकण्यात आले होते. विजयाताईंनी जनसंघ, भाजप, तसेच विविध राष्ट्रीय आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. अनेकदा कारागृहवास भोगला. आणीबाणीच्या काळात भूमीगत राहून ८ महिने कारावास भोगला. श्रीराममंदिर, गोहत्या बंदी, तिरंगा आंदोलन यांमध्ये त्यांच्या सक्रीय सहभाग होता. ‘शिवप्रतापदिन’ उत्सवाची परंपरा त्यांनीच चालू केली. प्रतापगड येथील अनधिकृत बांधकाम विरोधी आंदोलन चालू करून ते यशस्वी करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. विजयाताई यांना अनेक संस्था आणि संघटना यांच्या वतीने अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘त्यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता, हिंदुत्वनिष्ठ चळवळीचा आधारवड हरपला आहे’, अशी भावना जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ व्यक्त करत आहेत.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !