पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – योग्य वेळ आल्यावर पाकिस्तान अफगाण तालिबानविरोधात ठोस पावले उचलेल. ही पावले सैनिकी कारवाईच्या स्वरूपाचीही असू शकतात आणि राजनैतिक पातळीवर संबंध तोडण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. पाकिस्तानविरोधात काम करणार्या आतंकवादी संघटनांना मिळणारे समर्थन सहन केले जाणार नाही. पाकिस्तान आता अधिक काळ संयम बाळगणार नाही, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. ख्वाजा आसिफ यांनी तालिबान सरकारवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य देत असल्याचा आरोप केला. सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तान पाकिस्तानशी शत्रूराष्ट्रासारखे वागत असल्याचे त्यांनी म्हटले.
सध्या अफगाणिस्तानवर कारवाई करणे शहाणपणाचे नाही ! – ख्वाजा आसिफ
संरक्षणमंत्री आसिफ यांनी असेही सांगितले की, संपूर्ण प्रदेशातील स्थिती सध्या अत्यंत संवेदनशील आहे. इराणशी संबंधित धोके, मध्य-पूर्वेतील चालू असलेले संघर्ष, विशेषतः पॅलेस्टाईन आणि येमेनमधील परिस्थिती, तसेच आफ्रिकेतील अनेक भागांतील अस्थिरता, यांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. या सर्व कारणांमुळे सध्या अफगाणिस्तानवर थेट सैनिकी कारवाई करणे शहाणपणाचे ठरणार नाही. पाकिस्तानला प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक उचलावे लागेल, जेणेकरून तो एखाद्या मोठ्या प्रादेशिक संकटात अडकणार नाही.
तुर्कीयेसमवेत वाढते सहकार्य
पाकिस्तान आणि तुर्कीये यांच्यातील संरक्षण आणि रणनीतिक सहकार्य वेगाने वाढत असल्याचे संकेतही ख्वाजा आसिफ यांनी दिले. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही ठोस कराराची माहिती त्यांनी दिली नाही; मात्र येत्या काळात चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !