|

कोल्हापूर – ऐतिहासिक वारसा असलेल्या पन्हाळागडावरील पाराशर तीर्थ (सादोबा तलाव) परिसरात ३ मजली अनधिकृत बांधकाम आणि इतर धार्मिक अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे तात्काळ भुईसपाट करावीत, अन्यथा ‘गड स्वच्छता मोहीम’ राबवू, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना २७ जानेवारी या दिवशी दिले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील, विलास मोहिते, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री संदीप सासने, हिंदुराव शेळके, प्रतीक डिग्गे, नीलेश शिंदे, श्रीकांत कदम, सचिन भोसले, प्रदीप मोहिते, नागेश हुगार, बाबू साखळकर, अंजली जाधव, पूजा शिंदे, जयवंत खतकर, कैलास दीक्षित आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
| पन्हाळा गड हा केंद्र आणि राज्य संरक्षित स्मारक असून तो ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समाविष्ट आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचे नियम धाब्यावर बसवून ३ मजली पक्के सिमेंट काँक्रीटचे बांधकाम उभे राहिले आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन होत असून भविष्यात मिळणारा निधीही बंद होऊ शकतो. |
विश्व हिंदु परिषद आणि हिंदु एकता आंदोलन गेल्या २ वर्षांपासून या विषयावर पाठपुरावा करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत सदर जागा सरकारी असून बांधकामासाठी कोणतीही अनुमती घेतली नसल्याचे समोर आले आहे. असे असतांनाही वर्षभर कोणतीही कारवाई न होणे, ही प्रशासनाची मोठी त्रुटी असून संबंधित अधिकार्यांचे निलंबन करावे.
राज्यस्तरीय बातम्याअसे निवेदन का द्यावे लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांना हे अतिक्रमण का दिसत नाही ? प्रशासन झोपले आहे का ? |
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर