
मिरज (जिल्हा सांगली), २५ जानेवारी (वार्ता.) –मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज फाटा येथे १६ जानेवारीच्या रात्री २ वाजता बेळगावकडे शेतीमाल घेऊन जाणार्या श्री. अण्णासाहेब अडसूळ आणि श्री. भारत कापसे या २ शेतकर्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागातील पोलीस असल्याचे सांगून एका बनावट पोलिसाने लुबाडले आहे. या शेतकर्यांच्या वाहनाचा पाठलाग करून एका ‘पोलीस’, असे लिहिलेल्या गाडीने त्यांना अडवून गाडीची कागदपत्रे दाखवल्यानंतरही ‘कांद्याची ५ पोती माझ्या गाडीमध्ये टाका; अन्यथा मी ही गाडी पोलीस ठाण्यात जमा करतो’, अशी धमकी त्या तोतया पोलिसाने दिली, तसेच या शेतकर्यांच्या वाहनातील ५ कांद्याची पोती स्वत: समवेत नेली. या संदर्भात लोकांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित