श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सवाच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आणि ध्वजारोहण उत्साहात !

कार्यक्रमस्थळी ध्वजपूजन करतांना श्री. आशिष शहा आणि सौ. तृप्ती शहा, तसेच भाविक-भक्तगण

निपाणी (कर्नाटक) – निपाणीचे जागृत ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा ३ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. त्या महोत्सवाच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आणि ध्वजारोहण २३ जानेवारीला उत्साह अन् भावपूर्ण वातावरणात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिष शहा आणि सौ. तृप्ती शहा यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते, भाविक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हे वाचा → निपाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीचा मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार ! – शशिकला जोल्ले, आमदार, भाजप