
ओझर (जिल्हा पुणे) – मोरया गोसावींच्या पदांचा जयघोष, फुलांचा वर्षाव आणि ‘गणपतिबाप्पा मोरया’च्या चैतन्यमयी नादात श्री क्षेत्र ओझर येथे २२ जानेवारी या दिवशी श्री विघ्नहराचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलदिनी पहाटे ४.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे आणि सर्व विश्वस्त यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी अंबेराई ओझर येथे पृथ्वी-सूर्य पूजन करून पालखी सोहळा मार्गस्थ झाला, ज्यामध्ये श्रीराम आणि श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळांनी सहभाग घेतला. दुपारी १२.३० वाजता ह.भ.प. मयूर महाराज बोडके यांचे कीर्तन आणि पुष्पवृष्टी यांनी मुख्य जन्मोत्सव सोहळा पार पडला. संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि भाविकांची अलोट गर्दी यांमुळे अवघे ओझर भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.


या मंगलदिनी सौ. शकुंतलाबाई कवडे यांनी १ लाख २३ सहस्र ५०० रुपयांची देणगी देवस्थानाला सुपुर्द केली. दुपारी राहुल दुधवडे यांच्या संगीत भजनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, सर्व विश्वस्त, पुजारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप