
खेड, २३ जानेवारी (वार्ता.) – २० जानेवारी २०२६ या दिवशी तालुक्यातील आयनी येथील हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीगाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा शाळेतील ११४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी साधक श्री. ज्ञानेश्वर पाटील यांनी क्रांतीगाथा प्र्रदर्शनाचा उद्देश सांगितला.
अभिप्राय
१. कु. नक्षत्रा दत्ताराम कदम, इयत्ता नववी : हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून लावलेल्या या प्रदर्शनातून क्रांतीकारकांच्या कार्याची माहिती आणि महत्त्वही समजले. देश आणि धर्म यांसाठी प्राण देणार्या क्रांतीकारकांचे पुष्कळ मोठे योगदान लक्षात आले. आज समाजामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. या फलकांच्या माध्यमातून आम्हाला तो थांबवण्याविषयी माहिती मिळाली.
२. अक्षरा कृष्णा जाधव, आणि सेजल शिवराम भुवड, नववी : या प्रदर्शनामुळे प्रेरणा मिळाली. आई-बाबांना नमस्कार केला पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी केलेले कर्म लक्षात घेतले पाहिजे. वेळेचे महत्त्व, इतरांची सेवा करणे आणि नामस्मरणाचे महत्त्व या गोष्टी शिकायला मिळाल्या.
३. कु. तन्मय पांडुरंग पाष्टे, नववी : मिळालेली माहिती सभोवतालीच्या माणसांना पोचवण्याचा प्रयत्न करू. आळसपणा सोडून नीटनेटकेपणासारखे चांगले गुण आत्मसात् केले पाहिजेत.
४. कु. संस्कृती सचिन गावडे, नववी : अशी क्रांतीकारकांची माहिती आम्हाला कुठेही वाचायला मिळाली नव्हती.
५. कु. दूर्वा वामन करजवकर, सहावी : ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे.
६. कु. आर्या पांडुरंग जाधव, सहावी : झेंड्याचा अपमान कधीही करू नये.
७. कु. सुज्ञा श्रीकांत यादव आणि कु. जान्हवी चक्रधर महाकाळ, सहावी : सर्वांनी क्रांतीकारक आणि देशभक्त यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदु धर्माभिमान जागृत झाला ! – मुख्याध्यापक श्री. सुनील देशमाने
२० जानेवारी या दिवशी सकाळी साडेदहापासून ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘सनातन धर्म सेवा संघ’ आयनी-मेटे यांच्या वतीने प्रशाळेमध्ये ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’ सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आयोजित केले होते. या प्रदर्शनातून देशभक्त क्रांतीकारक, हिंदु धर्म संस्थापक शंकराचार्य ते भारतीय स्वतंत्र लढ्यातील अग्रणी नेते यांची छायाचित्रे अन् त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना झाली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, थोर नेत्याचे स्मरण, शिस्तबद्धता आणि हिंदु धर्माभिमान जागृत झाला. या प्रदर्शनाविषयी साधकांनी सेवाभावी वृत्तीने माहिती सांगितली. सर्व साधकांचे प्रशालेच्या वतीने आभार, असेच कार्यक्रम घडून हिंदुस्थानची सुजाण, देशप्रेमी, शिस्तप्रिय नागरिक घडण्यास साहाय्य होईल. आपल्या कार्यास शुभेच्छा !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !