|

नवी देहली : गोमाता रक्षणासाठी देहलीत १० मार्च २०२६ या दिवशी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात ‘गोमाता राष्ट्रमाता अभियाना’च्या मंचाच्या माध्यमातून देशातील ४ पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपिठावर येणार आहेत. गोरक्षणासाठी पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती हे आधीपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी गायींच्या रक्षणाचे व्रत घेण्यासाठी स्वतःचे सिंहासन आणि छत्र त्यागले आहे.
🐄 Gau Mata = Rashtra Mata 🇮🇳
A historic moment for Sanatan Dharma 🕉️
On March 10, 2026, Delhi will witness history as the Shankaracharyas of all four Peethas come together on one stage for the ‘Gau Mata Rashtra Mata’ Conference 🙏
🔥 Swami Nischalananda Saraswati of Puri… pic.twitter.com/AHFvhSmqTq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2026
यापूर्वी १९ मे २००७ या दिवशी कर्नाटकातील बेंगळुरू येथे रामसेतू संदर्भात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चारही पीठांच्या शंकराचार्यांनी एकाच व्यासपिठावर उपस्थिती दर्शवली होती. शृंगेरी येथे पहिली चतुष्पीठ परिषद वर्ष १७७९ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चारही शंकराचार्य सहभागी झाले होते. आता धार्मिक इतिहासात तिसर्यांदा चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपिठावर एकत्र दिसतील. हा सनातन परंपरेसाठी एक ऐतिहासिक क्षण असेल.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण