स्वतःच्या लहानसहान दुखण्यावर प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदातील औषधांचा वापर करण्याची सवय लावा !

युद्धकाळामध्ये ॲलोपॅथीतील औषधे सैन्यासाठी जास्त प्रमाणात राखून ठेवली जातात. त्यामुळे औषधांचा तुटवडा होतो. आपत्काळामध्ये अशा स्थितीमध्ये अडचण येऊ नये, यासाठी आतापासून स्वतःच्या लहानसहान त्रासांसाठी आयुर्वेदातील औषधांचा वापर करा.

सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण इत्यादी आयुर्वेदातील औषधांमध्ये पोरकिडे झाल्यास काय करावे ?

अशी चूर्णे चाळून, डबीत भरून डबीचे झाकण घट्ट लावून कोरड्या वातावरणात ठेवावीत. पाऊस नसेल, तेव्हा ही चूर्णे उन्हात वाळवून डबीत भरून ठेवावीत. ही चूर्णे शीतकपाटात ठेवल्यास अधिक कालावधीसाठी सुरक्षित रहातात.’

आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधांच्या समाप्ती तिथीविषयी (एक्सपायरी डेटविषयी) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केलेला अभ्यास

अमेरिकेच्या सैन्याकडे आपत्कालीन साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा केलेला असतो. सैन्याला यातील कोट्यवधी डॉलर्सची औषधे केवळ समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) झाली; म्हणून फेकून देऊन नवीन विकत घ्यावी लागत.

आयुर्वेदातील औषधे आणि त्यांची समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट)

आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ?

हृदय आणि श्वसनसंस्था यांना बळ देणारी आयुर्वेदातील काही प्रसिद्ध औषधे

काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदातील काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे

सितोपलादी चूर्ण : आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते.

तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे

१. महासुदर्शन घनवटी : ‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये कोणत्याही वयोगटामध्ये निर्धाेकपणे (बिनदिक्कतपणे) वापरता येण्यासारखे हे औषध आहे. (साभार : ‘सिद्धयोग संग्रह’ / ‘आयुर्वेद सार संग्रह’) या औषधामुळे शरिरातील तापाचे विषार मलावाटे बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते.

आयुर्वेदाची काही सुवर्णयुक्त औषधे

आयुर्वेदाच्या औषधांमध्ये ‘सुवर्णयुक्त औषधे (सुवर्णकल्प)’ उत्तम ‘रसायन’ म्हणून गणली जातात.

सकाळी उठल्यावर येणार्‍या शिंका

‘शिंका येण्याचे कारण प्रत्येक वेळी कोरोनाच असते’, असे नाही. रात्रीच्या थंड वार्‍यामुळे नाक चोंदणे, हेही एक प्राथमिक कारण असू शकते. थंड वार्‍यामुळे नाकाच्या अस्थीविवरामधून (सायनसमधून) वाहणारा द्रव चोंदून रहातो.

पायदुखी असणार्‍यांनी थंड फरशीशी थेट संपर्क टाळावा !

पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत फरशी थंड असते. विशेषतः संगमरवर, ग्रेनाईट, कोटा या प्रकारातील फरश्या अधिक थंड असतात. पायांचे तळवे, घोटे किंवा गुडघे दुखण्यामागील एक कारण ‘थंड फरशीशी सततचा थेट संपर्क’ हेही असते.