सोलापूर येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने ममता बॅनर्जींवर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

नुकतेच मुंबई दौर्‍यावर असतांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रगीताच्या ४ ते ५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत पूर्ण न करता निघून गेल्या.

अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील ८ सहस्र एकर क्षेत्रातील द्राक्षबागांची हानी !

सततच्या हवामानाच्या पालटामुळे द्राक्ष, डाळींब, केळी, सीताफळ, पेरू यांसह अन्य फळबागा आणि भाजीपाल्याच्या शेतीची हानी होत आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पार्कींग’ला शिस्त लावण्यासाठी नियम लागू !

‘पार्कींगला शिस्त लावण्यासाठी एकही वाहन पोर्चमध्ये येणार नाही’, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वत:पासून सूचनांचे पालन करण्यास प्रारंभ केला.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच महिलांवर अत्याचार करणारे आहेत ! – भाजपच्या नेत्या नीता केळकर

महाविकास आघाडी सरकारच्या २ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात महिला आणि युवती यांवर वाढलेल्या अत्याचारांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती केळकर बोलत होत्या.

सोलापूर येथील एस्.टी. कर्मचार्‍याने नातेवाईकांना भेटण्यासाठी मद्याच्या नशेत पळवली एस्.टी. बस !

एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू असल्यामुळे सर्व बसगाड्या बंद आहेत. घडलेला हा प्रकार अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित बसचा शोध चालू केला आणि पोलिसांच्या साहाय्याने चालकाला तेलगाव येथे पकडले.

कार्तिकी यात्राकाळात यात्रेकरू न्यून येऊनही मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ !

यंदा एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे यात्रेकरू अपेक्षित संख्येने येऊ शकले नाहीत; मात्र तरीही मागील वर्षींच्या तुलनेत मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले !

देशभरातील कानाकोपर्‍यांतून श्री विठ्ठलाचे भक्त कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येतात. एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकर्‍यांना कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे येता आले नाही.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित !

कोरोना संसर्गामुळे २ वर्षांनंतर भरलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. अनुमाने २ लाखांहून अधिक भाविक शहरात आले आहेत.

६५ वर्षांच्या पुढील भाविकांनाही श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार !

प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथील केल्याने वारकर्‍यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्यासाठी राज्य सरकारची अनुमती !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?