२० मासांनंतर कार्तिकी यात्रा भरणार !

कोरोनाच्या संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साधारण २० मासांनंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार आहे. 

राष्ट्र आणि धर्म यांप्रती आस्था निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी युवा पिढीला धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगावे ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील विद्यानिकेतन प्रशालेत ‘राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी !

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात वसुबारसेनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गोपूजनाच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.

कार्तिक वारीसाठी ६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत २४ घंटे मुखदर्शन ! – मंदिर समितीचा निर्णय

यात्रेला येणार्‍या भाविकांना लसीकरणाची कोणतीही अट न घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून मुखपट्टी आणि सामाजिक अंतराचे नियम मात्र पाळले जाणार आहेत.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘लाँग मार्च’ काढणार ! – खासदार छत्रपती संभाजीराजे

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ‘लाँग मार्च’ काढण्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या वेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करतांना ते बोलत होते.

रणांगणात लढलेल्या वीरांगनांचा आदर्श घेऊन स्वत:मध्ये शौर्य निर्माण करा ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती 

भवानीमातेच्या कृपाशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; मात्र सध्या हिंदु स्त्रियांचे धर्मांतर करून त्यांना जिहादी आतंकवादी बनवणे, हिंदु स्त्रियांना नक्षलवादी चळवळीत सहभागी करून घेणे यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हिंदु युवतींनी अभिनेत्रींचा आदर्श न घेता…..

कार्तिक वारी पूर्ववत् करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे निवेदन !

कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ते सर्व निर्बंध शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असणारी कार्तिकी वारी सध्या पूर्ववत् चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन…

सामाजिक माध्यमावर तरुणीची अपकीर्ती करणार्‍या पंजाबच्या तरुणास अटक !

आजच्या तरुण पिढीवर सामाजिक माध्यमांची भुरळ आहे; मात्र त्यांचा अनिर्बंध आणि अविचारी वापर यांमुळे नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याविषयी पालक आणि समाज यांनी सजग होणे आवश्यक आहे.

पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र’ संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी ही निवड केली आहे.